उर्वशी रौतेला एका इन्स्टाग्राम पोस्टसाठी घेते ए...

उर्वशी रौतेला एका इन्स्टाग्राम पोस्टसाठी घेते एवढी फी (Urvashi Rautela Takes So Many Crores For Posting A Post On Instagram, You Will Be Stunned To Know)

सुप्रसिद्ध अभिनेत्री आणि मॉडेल उर्वशी रौतेलाची फॅन फॉलोइंग जबरदस्त आहे. मग ती ऑफलाइन असो किंवा ऑनलाइन. त्यामुळेच ती इन्स्टाग्रामवर पोस्ट करण्यासाठी करोडो रुपये फी घेते. उर्वशी रौतेलाचे इंस्टाग्रामवर ५ कोटी ७८ लाख फॉलोअर्स आहेत. ती अनेकदा इन्स्टाग्रामवर लाइव्ह येऊन चाहत्यांशी संवाद साधते. आज आम्ही तुम्हाला उर्वशी इन्स्टाग्रामच्या एका पोस्टसाठी किती रुपये घेते ते सांगणार आहोत.

 उर्वशी रौतेला इंस्टाग्रामवर एक पोस्ट टाकण्यासाठी साडेतीन कोटी रुपये घेते. तिचे सोशल मीडिया अकाउंट हॅण्डल करणाऱ्या टीमने ही माहिती मेल द्वारे प्रेसला दिली.

उर्वशी रौतेला दररोज सोशल मीडियावर आपल्या संबंधित अपडेट्स देत असते. त्यासोबतच ती फॅशन आणि लाइफस्टाइलशी संबंधित गोष्टीही शेअर करत असते. यासाठी तिला कोटींमध्ये पैसे मिळतात. त्यामुळे तिने आपल्या फीमध्येही भरमसाठ वाढ केली आहे.

उर्वशी रौतेलाच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे तिला हे यश मिळाले आहे. अनेक उत्पादनांची ऑनलाइन जाहिरात करून ती भरपूर पैसे कमावते. उर्वशीने इथपर्यंत पोहोचण्यासाठी खूप मेहनतही घेतली आहे.

भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू विराट कोहलीला सोशल मीडियावर प्रमोशनसाठी सर्वाधिक पैसे मिळतात. विराट एका पोस्टसाठी 8 कोटी रुपये घेतो. तर उर्वशीबद्दल बोलायचे झाल्यास 2022 च्या यादीनुसार तिचा 5 वा क्रमांक आहे. याबाबतीत तिने एमएस धोनी, सलमान खान आणि रणवीर सिंग यांसारख्या सेलिब्रिटींनाही मागे टाकले आहे. लवकरच ती हॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. बॉलिवूडमध्येसुद्धा तिने अनेक चित्रपटांत महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.

फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम