बिकिनी घालून दिल्या करवा चौथच्या शुभेच्छा…...

बिकिनी घालून दिल्या करवा चौथच्या शुभेच्छा… उर्वशी रौतेलाचे भलतेच धाडस (Urvashi Rautela Sends Best Wishes On Karva Chauth, Wearing A Bikini)

आपलं नाव सार्थ करणारे उर्वशी रौतेलाचं सौंदर्य आहे. ती सोशल मीडियावर आपले फोटो आणि व्हिडीओ टाकून कायम सक्रिय राहते. आता तिने या मंचावर मोठेच धाडस केले आहे.

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम
उर्वशीने आपला नवा व्हिडीओ टाकला आहे. तो वेगाने व्हायरल होत आहे. त्यात समुद्रकिनाऱ्यावर बिकिनी घालून बागडते आहे. त्यासोबत तिने चाहत्यांना करावा चौथच्या शुभेच्छा दिल्या आहेत. गुलाबी रंगाची बिकिनी आणि डोक्यावर हॅट उर्वशीने घातली आहे. त्यात ती खूपच ग्लॅमरस दिसते आहे. समुद्र किनाऱ्यावर या वेशभूषेत बागडून ती आपलं यौवन प्रदर्शन करते आहे.

या व्हिडिओत उर्वशीने ‘हॅपी करवा चौथ २०२१’ अशा शुभेच्छा दिल्या आहेत. पारंपारिक पवित्र सणाच्या निमित्ताने बिकिनीत देहप्रदर्शन करून उर्वशीने भलतेच धाडस दाखविले आहे. त्याबद्दल चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया दिल्या आहेत.

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम
उर्वशीच्या कामाबद्दल सांगायचं तर ती ‘वर्साचे बेबी’ या चित्रपटात अरबी सुपरस्टार मोहम्मद रमजान सोबत दिसली होती. ‘इन्स्पेक्टर अविनाश’ या वेब सिरीजमध्ये ती रणदीप हुडा  सोबत दिसणार आहे.

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम