उर्वशी रौतेलाने ऋषभ पंतची मागितली माफी, दोन्ही ...

उर्वशी रौतेलाने ऋषभ पंतची मागितली माफी, दोन्ही हात जोडून बोलली, ‘आय ॲम सॉरी…’ (Urvashi Rautela Says, ‘I Am Sorry’ To Risabh Pant, Watch Video)

बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. भारताचा यष्टिरक्षक रिषभ पंत (Rishabh Pant) आणि उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) यांच्यातील नात्याबाबत बऱ्याच दिवसांपासून सोशल मीडियावर (Social Media) जोरदार चर्चा सुरु आहे. नुकत्याच झालेल्या एका मुलाखती दरम्यान उर्वशी रौतेलाने ‘RP’ शब्दाशी निगडीत बरंच काही भाष्य केलं होतं. जे रिषभ पंतसाठीच होतं असं म्हटलं जात आहे. ज्यामुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली होती. आता नुकताच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यामध्ये उर्वशी रौतेला रिषभ पंतची माफी मागताना दिसत आहे.

चर्चेचा विषय बनलेल्या त्या मुलाखतीत उर्वशी असे म्हणताना दिसली होती की, आरपी म्हणजेच (रिषभ पंत) हॉटेलच्या लॉबीमध्ये तिची वाट पाहत असे. यानंतर तिने सांगितले की, जेव्हा ती तिथे पोहोचू शकली नाही, त्यानंतर रिषभ पंतचे १७ मिस्ड कॉल तिच्या फोनवर येऊन गेले होते. उर्वशीने सांगितले की, ती शूटिंगमध्ये व्यस्त होती आणि थेट रात्री हॉटेलमध्ये पोहोचली. म्हणून तिने त्याला मुंबईत भेटण्यास सांगितले होते.

उर्वशीच्या या मुलाखतीच्या व्हिडिओवर ऋषभने जळजळीत प्रतिक्रिया दिली होती. ‘प्रसिद्धीसाठी काही लोकांना मुलाखतीत खोटं बोलताना पाहून वाईट वाटतं,’ असं तो म्हणाला होता. त्यानंतर उर्वशी गप्प थोडीच बसणार होती. तिने यावर प्रतिउत्तर देत ऋषभला छोटू भैय्या, आपल्या खेळावर लक्ष दे, असं म्हटलं होतं. दरम्यान उर्वशी व ऋषभ यांच्यात जणू वाक्‌ युद्धच चालू झालं. परंतु आता याची सांगता करण्याच्या विचाराने उर्वशीने नमते घेतलेले दिसतेय.

नुकतेच पापराजींनी तिला आरपीला काही मेसेज देऊ इच्छिते का? असे विचारल्यानंतर सुरुवातीला तिने यावर मी काहीही म्हणू इच्छित नाही, असं म्हटलं. पण लगेचच अगदी हात जोडून, आय ॲम सॉरी, असं म्हटलं आहे. आता हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. आरपी आधी पाकिस्तानी क्रिकेटर नसीम शाहमुळे देखील उर्वशी चर्चेत आली होती. परंतु त्याने तर उर्वशीला ओळखण्यासही नकार दिला होता.