उर्वशी रौतेलाने करवा चौथ बद्दल आधीच शुभेच्छा दि...

उर्वशी रौतेलाने करवा चौथ बद्दल आधीच शुभेच्छा दिल्या म्हणून तिला ट्रोल करत चाहते म्हणाले, ऋषभ पंतसाठी तू उपवास करणार आहेस का ? (Urvashi Rautela Congratulated Karva Chauth In Advance, Users Asked Will You Also Keep Fast For Rishabh Pant)

उर्वशी रौतेला सध्या ऑस्ट्रेलियाला गेली असून तिथून ती सतत आपले फोटो आणि व्हिडिओ शेअर करत आहे. यावरून क्रिकेटपटू ऋषभ पंतबद्दल तिच्या मनात काहीतरी खास असल्याचे दिसून येते. अलीकडेच, सोशल मीडियावर फोटो शेअर करताना, उर्वशीने आपल्या चाहत्यांना करवा चौथच्या आगाऊ शुभेच्छा दिल्या. हे फोटो पाहून चाहते तिला ट्रोल करत आहेत.

उर्वशी रौतेला आणि ऋषभ पंत दोघेही वेगवेगळ्या कारणांनी सोशल मीडियावर चर्चेत असतात, पण यावेळी चर्चेचे कारण वेगळे आहे. सध्या उर्वशी सोशल मीडियावर अशा काही पोस्ट शेअर करत आहे, ज्यावरून ती ऋषभ पंतच्या प्रेमात पडल्याचे दिसून येते.

ऋषभ पंतसोबतच्या अफेअरच्या बातम्यांदरम्यान, नुकतेच उर्वशीनेही करवा चौथच्या शुभेच्छा दिल्या आहेत, त्यानंतर युजर्स तिला ट्रोल करत आहेत.

युजर्स कमेंट बॉक्समध्ये अभिनेत्रीला , तू सुद्धा उपवास ठेवणार का? असा प्रश्न विचारत आहेत. तर काही जण, कृपया ऋषभला क्रिकेटवर लक्ष केंद्रित करू दे असे म्हणत आहेत. एकाने कमेंटमध्ये त्याचा नाद सोड तो आधीच कमिटेड आहे असे म्हटले आहे.

एका युजरने कमेंट केली की हे कदाचित हे ऋषभ पंतसाठी आहे? दुसर्‍याने लिहिले हे सर्व सोड, मला सांग तू भावनिक कविता कधी लिहिणार ? आणखी एकाने ऋषभला काही स्पेशल का असा प्रश्न विचारला आहे.