सोळाव्या वर्षी झाली जुळ्यांची आईः कोमोलिकाची कर...

सोळाव्या वर्षी झाली जुळ्यांची आईः कोमोलिकाची कर्मकहाणी (Urvashi Dholakia Aka Komolika Of Kasautii Zindagii Kay Became Mother Of Twins At Age Of 16, Got Divorced After Giving Birth To Twins)

‘कसौटी जिंदगी की’ या मालिकेतील कोमोलिका म्हणजे उर्वशी ढोलकियाला विसरता येणं शक्य नाही. या मालिकेतील तिची नकारात्मक भूमिकाही इतकी लोकप्रिय झाली की आजही लोकं तिला कोमोलिकाच्या नावानेच ओळखतात. वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी उर्वशीने जूळ्यांना जन्म दिला. त्यानंतर उर्वशीने एकटीने आपल्या मुलांना वाढवले आहे.

उर्वशी ढोलकियाने लहानपणीच अभिनयाला सुरुवात केली. सहा वर्षांची असतानाच तिने पहिली जाहिरात केली. टीव्ही मालिका ‘देख भाई देख’ मध्ये तिने काम केलं. त्यानंतरही उर्वशीने अनेक मालिका केल्या, परंतु ‘कसौटी जिंदगी की’ या मालिकेने तिला जी ओळख दिली ती तिची कायमची ओळख झाली. आजही लोक तिला कोमोलिका म्हणूनच ओळखतात. मोठी टिकली, भडक पेहराव आणि एकंदरच एका नकारात्मक भूमिकेला शोभतील असे तिचे नखरे दर्शकांच्या कायम स्मरणात राहिले. त्यानंतर अनेक मालिकांमधून स्त्रीयांना नकारात्मक भूमिकेत दाखविण्याची प्रथाच निर्माण झाली. मात्र उर्वशीचं डेली सोपमधील फिमेल वॅम्प म्हणून असलेलं नंबर वनचं स्थान कायम राहिलं.

उर्वशी ढोलकिया ने ‘कहानी तेरी मेरी’, ‘घर एक मंदिर’, ‘कभी सौतन कभी सहेली’, ‘कहीं तो होगा’, ‘बेताब दिल की तमन्ना है’ ‘बिग बॉस’, ‘नच बलिए’, ‘चंद्रकांता’ अशा अनेक टी. व्ही. मालिकांमध्ये काम केले आहे.

उर्वशीने एकटीने केले मुलांचे संगोपन
टीव्हीवर आपल्या अभिनयाने सगळ्यांचं मन जिंकणाऱ्या उर्वशीला तिच्या खाजगी आयुष्यात मात्र अनेक चढ-उतार पाहावे लागले आहेत. पंधराव्या वर्षी उर्वशीचं लग्न झालं आणि लगेचच १६ व्या वर्षी तिनं जूळ्या मुलांना जन्म दिला. लग्नानंतर अवघ्या दीडच वर्षात ती आपल्या पतीपासून दूर झाली. अर्थात हे सगळं सिनेमात घडावं असं तिच्या आयुष्यात घडलं असं म्हणावं लागेल. पंरतु तिनेही बिनतक्रार एकटीनेच आपल्या मुलांचं संगोपन केलं.

मुलांना मोठं करताना तिला भरपूर मेहनत करावी लागली. मुलं लहान असताना तिला तासंनतास शुटींगसाठी बाहेर राहावं लागलं. त्यातूनही ती धैयाने बाहेर पडली. उर्वशी सिंगल मदर आहे आणि तिची दोन्ही मुलं आता मोठी झाली आहेत. उवर्शी आणि तिच्या मुलांमध्ये अतिशय प्रेमळ असं बाँडिंग आहे. उर्वशी बरेचदा आपल्या मुलांसोबतचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करते. आणि तिने शेअर केलेल्या फोटोंना चाहत्यांकडूनही उत्तम प्रतिसाद मिळतो. तुम्हीही हे सुंदर फोटो पाहा.

उर्वशी ढोलकियाचं लव लाइफ
डांस रियालिटी शो ‘नच बलिये 9’ मध्ये उर्वशी ढोलकिया आणि अनुज सचदेवा यांच्या केमिस्ट्रीने कमाल केली. त्यामुळेच त्यांच्यातील प्रेमसंबंध सगळ्यांच्या नजरेत आले. तोपर्यंत त्यांच्यातील प्रेमाबद्दल पुसटशी कल्पनाही कोणाला नव्हती. डांस रियालिटी शो ‘नच बलिये 9’ मध्ये उर्वशी आणि अनुज सचदेवा यांनी पहिल्यांदा आपल्यातील नात्याचा खुलासा केला. विशेष म्हणजे अनुज वयाने उर्वशीपेक्षा ५ वर्षांनी लहान होता. त्यानंतर ५ वर्षे हे नातं टिकलं आणि दोघं वेगळे झाले. अनुजच्या आईला दोघांचं नातं मंजूर नसल्याने ते फार काळ टिकलं नाही. उर्वशी व अनुज दोघांनीही आईला न दुखावता एकमेकांमधील नातं तिथेच संपवण्याचा निर्णय घेतला. पण आजही उर्वशी आणि अनुज एकमेकांचे चांगले मित्र आहेत. त्यांच्या नात्यातील प्रेम चाहत्यांनी ‘नच बलिये ९’ मध्ये पाहिलं आहे.

उर्वशी ढोलकिया अतिशय बोल्ड आणि बिनधास्त व्यक्तीमत्त्वाची आहे. आणि तिचा हा अंदाज तिच्या फोटोंमधूनही दिसतो. ती नेहमी सोशल मीडियावर आपले फोटो शेअर करत असते. तुम्हीही तिचे बोल्ड आणि सुंदर फोटो पाहा…