तब्बल 10 वर्षांनी अभिनेत्री उर्मिला मातोंडकरचे ...

तब्बल 10 वर्षांनी अभिनेत्री उर्मिला मातोंडकरचे छोट्या पडद्यावर पुनरागमन..(Urmilla Matondkar Makes A Come Back On Small Screen After 10 Years)

अभिनेत्री उर्मिला मातोंडकर आणि भाग्यश्री ही जोडी एकत्र लवकरच टीव्हीवर पाहयला मिळणार आहे. 90 च्या दशकात मोठा पडदा गाजवणाऱ्या या अभिनेत्री आपल्याला रिअॅलिटी शोच्या परीक्षक म्हणून पाहायला मिळतील. ‘डान्स इंडीया डान्स सुपर मॉम 3’ या शोचे दोघी परीक्षण करतील. यांच्यासोबत  कोरिओग्राफर रेमो डीसूजा सुद्धा परीक्षक म्हणून दिसेल.

अभिनेत्री भाग्यश्रीची परीक्षक म्हणून काम करण्याची ही पहिलीच वेळ आहे. काही दिवसांपूर्वी ती ‘स्मार्ट जोडी’ या रिअॅलिटी शोमध्ये आपला पती हिमालय दासानी सोबत दिसली होती. तर अभिनेत्री उर्मिला मातोंडकर 10 वर्षांनी टीव्हीवर पुनरागमन करत आहे.

रंगीला, जुदाई, सत्या यांसारख्या चित्रपटांतून प्रेक्षकांना आपल्या अभिनयाची भुरळ घालणारी अभिनेत्री उर्मिला मातोंडकर 10 वर्षांनी डान्सच्या रिअॅलिटी शोमध्ये पुर्नागमन करण्यास सज्ज आहे. हा शो जुलै महिन्यात सुरु होईल.

आई होऊनही डान्सचे प्रेम ज्या महिलेत शास्वत आहे अशा आईंसाठी हा रिअॅलिटी शो असणार आहे. या शोच्या आधीच्या सीजनचे परीक्षण गोविंदा , गीता कपूर आणि टेरेंस ल्यूईसने केले होते.

अभिनेत्री उर्मिला मातोंडकर गेला बराच काळ चित्रपटांपासून दूर आहे. उर्मिलाने तिच्या करीअरची सुरुवात मासूम या चित्रपटात बालकलाकार म्हणून केली होती. त्यानंतर तिने अनेक चित्रपटांमध्ये काम केले. 10 वर्षांपूर्वी ती एका मराठी डान्स रिअॅलिटी शो ची परीक्षक होती.

मध्यंतरी एका मुलाखतीत उर्मिला म्हणाली होती की,’’ ती स्क्रीनवर पुन्हा काम करण्यास पूर्णपणे तयार होती. मी एका वेब शो चे शूटिंग सुरु करणारच होती की कोरोना आला त्यामुळे ते शूटिंग पुढे ढकलले गेले. मी जेव्हा माझ्या करीअरकडे मागे वळून पाहते तेव्हा असे वाटते की जो पर्यंत एखादे चांगले काम हाती येत नाही तो पर्यंत इतर कोणताही प्रोजेक्ट हातात घेण्यात काहीच अर्थ नाही. केवळ करायचं म्हणून मी काहीही करणार नाही.’’