उर्फी म्हणाली, माझा नाइलाज आहे, मला कमी कपडे घा...

उर्फी म्हणाली, माझा नाइलाज आहे, मला कमी कपडे घालावेच लागतात… जाणून घ्या काय आहे कारण (Urfi said the reason for wearing less clothes)

सध्या उर्फी जावेद हे प्रकरण जोरदार चालू आहे. आपल्या चित्रविचित्र कपड्यांमुळे ती नेहमीच चर्चेत असते. पण त्याशिवाय ती आपल्या बेताल बोलण्यामुळेही वादात सापडते. सध्या उर्फी आणि एका राजकिय महिला नेत्यामध्ये वादाची खडाजंगी चालू आहे. त्या महिला नेत्याने महाराष्ट्रात अश्लिलता पसरवण्याचा आरोप करत उर्फीची पोलिसांत तक्रार करण्याची चेतावणी दिली होती.

उर्फी नेहमीच सार्वजनिक ठिकाणी अत्यंत तोकडे आणि मादक कपडे घालून पापाराझींना फोटोसाठी पोज देत असते. हा तिचा पब्लिसिटी स्टंट असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. तर अनेकजण तिच्या हिंमतीला दाद देत तिचे कौतुक करतात.

आता उर्फीने एक व्हिडिओ पोस्ट करत आपल्या कमी कपडे घालण्यामागचे कारण सांगितले आहे. त्यात तिने कमी कपडे घालणे हा आपला नाइलाज असल्याचे म्हटले आहे. उर्फी म्हणाली की, मला बऱ्याचदा विचारलं जातं की तू कमी कपडे का घालतेस पण याचं कारण म्हणजे कपड्यांमुळे मला येणारी अॅलर्जी हे आहे.

अंगभर कपडे किंवा लोकरीचे कपडे घातले तर मला एलर्जी येते आणि म्हणूनच मी नेहमी कमी कपड्यांमध्ये तुम्हाला दिसते. ती येणारी ऍलर्जी टाळण्यासाठी मी कमी कपडे घालते. मला कपड्यांची अॅलर्जी आहे.”