उर्फी जावेदचे डोळे अंडर आय फिलरमुळे झाले विद्रु...

उर्फी जावेदचे डोळे अंडर आय फिलरमुळे झाले विद्रुप, फोटो शेअर करत प्रॉडक्ट खरेदी न करण्याचे केले चाहत्यांना आवाहन (Urfi Javed’s Under-Eye Fillers Goes Wrong, Actress Shares Pictures With Her Swollen Face, Says- All Dark Circle Creams Are A Scam)

उर्फी जावेद तिच्या अनोख्या बोल्ड स्टाइलसाठी प्रसिद्ध असतेच, याशिवाय ती आपल्या समस्याही चाहत्यांसोबत शेअर करते. उर्फीची लेटेस्ट इंस्टाग्राम पोस्ट पाहून सर्वांनाच धक्का बसला आहे. यावेळी अभिनेत्री आपल्या इन्स्टा स्टोरीवर मेकअपशिवाय दिसली आणि या पोस्टद्वारे अभिनेत्रीने अंडर आय फिलर क्रीम बनवणाऱ्या कंपन्यांचा पर्दाफाश केला.

उर्फीने या पोस्टमध्ये एक फोटो पोस्ट केला आहे ज्यामध्ये तिचा चेहरा सुजलेला दिसत आहे, तिचे डोळेही सुजले असून डोळ्याखाली काळी वर्तुळे दिसत आहेत. उर्फीने फोटोवर लिहिले आहे की– हे काल मी मेकअप करून लपवले होते. मला स्वतःचा अभिमान आहे, नाही-नाही, मला कोणी मारले नाही. मी अंडर आय फिलर केले होते ज्यामुळे मला ही जखम झाली आहे.

याच्या पुढे, उर्फीने एक व्हिडिओ पोस्ट केला आहे त्यात ती म्हणाली की – मी अंडर आय फिलर केले आहे. माझ्या डोळ्याखाली खूप घाणेरडी काळी वर्तुळे आली आहेत. हे सर्व काळी वर्तुळे किंवा आय क्रीम्समुळे झाले आहे. अशी कोणतीही आय क्रीम नाही जी तुमची काळी वर्तुळे घालवू शकतात. काहीही नाही…. त्यांच्यासाठी फिलर हा उत्तम पर्याय आहे. यासोबतच अभिनेत्रीने कॅप्शन दिले आहे- सर्व अंडर आय क्रीम्स खराब आहेत, ते खरेदी करू नका.

उर्फीला तिच्या फॅशन सेन्ससाठी अनेकदा ट्रोल केले जाते. अलीकडेच भाजप कार्यकर्ता दिनेश देसाई यांनीही उर्फीचे नाव घेऊन राहुल गांधींवर निशाणा साधला. त्यांनी ट्विट करून म्हटले- जर राहुल गांधी थंडीत फक्त टी-शर्ट घालून देशाचे पंतप्रधान होऊ शकतात, तर उर्फी जावेद अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष व्हावे.

यावर सडेतोड उत्तर देताना उर्फीने आपण राजकारणी असल्याचे लिहिले होते. काहीतरी चांगले करा,तुमचा मुद्दा सिद्ध करण्यासाठी एखाद्या महिलेचा अपमान करू नका. या लोकांकडून आपल्या स्त्रियांचे रक्षण करण्याची अपेक्षा आपण कशी करू शकतो? असेही ती म्हणाली होती.