व्हायरल व्हिडिओ : उर्फी जावेदने ब्लाउजशिवाय साड...

व्हायरल व्हिडिओ : उर्फी जावेदने ब्लाउजशिवाय साडी नेसून केला डान्स, लोक म्हणाले- आता ब्लाउज घालण्याचा जमाना राहिला नाही असं वाटतं…(Urfi Javed Wears Saree Without Blouse, Watch Her Latest Dance Video)

उर्फी जावेदने अतरंगीपणा केला आणि त्याची बातमी झाली नाही, हे अशक्य आहे. फॅशन सेन्स आणि उर्फी यांचा फार लांबलांबपर्यंत काहीही संबंध नाही, हे आपण अनेकदा पाहतो. उर्फीला तिच्या विचित्र ड्रेसिंग सेन्ससाठी अनेकदा ट्रोल केले जाते आणि आता तिला याची सवय झाली आहे. कारण ती कोणाचीही पर्वा करत नाही आणि ती जे काही करते ते तिला योग्यच वाटते.

कधी ती बटणे उघडून पँट घालते, तर कधी ब्रा पेक्षा लहान क्रॉप टॉप घालून एअर पोर्टवर येते. आता उर्फीने एक बोल्ड व्हिडिओ पोस्ट केला आहे; ज्यामध्ये तिने खूप सुंदर साडी घातली आहे, परंतु तिने ब्लाउजच घातलेला नाही. या व्हिडीओमध्ये ती डान्स करताना दिसत आहे आणि नाचता नाचता ती मागे वळून आपली उघडी पाठ दाखवत आहे.

तिचा हा व्हिडिओ भलताच व्हायरल होत असून युजर्स तिला ट्रोल करत आहेत. तू ब्लाउज घालायला विसरलीस का? असं कोणी विचारलंय तर एकाने साडीसोबत ब्लाउजही घालायचा असतो, याची तिला आठवण करून दिलीय. काहींनी वेडी झालीय, असंही म्हटलं आहे तर एकानं म्हटलं की, आता ब्लाउज घालण्याचा जमाना नाही राहिला वाटतं… पाहा हा व्हायरल व्हिडिओ…