नेहमीच बोल्ड, तरी विचित्र आणि अगदी वाईट पद्धतीच...

नेहमीच बोल्ड, तरी विचित्र आणि अगदी वाईट पद्धतीची फॅशन करून, चाहत्यांची नापसंती ओढवून घेणारी उर्फी जावेद ( Urfi Javed Trolled For Her Bold But Pathetic Fashion Choice)

उर्फी जावेदचं नाव घेताच तिनं काहीतरी नवा घोटाळा केला असल्याची अटकळ तिचे चाहते बांधतात. कारण यापूर्वी तिने असे वाद ओढवून घेतलेले आहेत. कधी विमानतळावर आपली ब्रा तिने दाखवली आहे तर कधी पॅन्टचं बटन उघडं ठेवण्याचा निर्लज्ज प्रताप तिनं केला आहे.

कधी सॉक्सच्या आकाराचा टॉप ती घालते तर कधी विचित्र बॅकलेस ड्रेस घालते. तेव्हा चाहते तिला सांगतात की, बाई गं, अंग उघडे टाकल्याची फॅशन होत नसते. एकतर तू एखादी चांगली स्टायलिस्ट बाळग किंवा आपला फॅशन सेन्स सुधार.

उर्फी वारंवार टीकेची धनी का होते, ते आता तुम्हीच पाहा.

हा टॉप उर्फीने विमानतळावर घातला होता. तो इतका तोकडा होता की, त्यापेक्षा तिची गुलाबी ब्रा लांब होती. अशी फॅशन कुणी गर्दीच्या ठिकाणी करेल का? पण उर्फीने केली. त्यावर चाहत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. फॅशन सेन्स कमी आणि नॉनसेन्स ज्यादा, अशी प्रतिक्रिया लोकांनी दिली होती.

तिच्या जवळपास प्रत्येकच अंग उघडे टाकणाऱ्या विचित्र ड्रेस सेन्सवर लोक टीका करतात.

सर्व फोटो – इन्स्टाग्राम