जया बच्चन आणि फोटोग्राफर्सच्या भांडणात नाक खुपस...

जया बच्चन आणि फोटोग्राफर्सच्या भांडणात नाक खुपसून उर्फी जावेदने तिला सुनावले खडे बोल (Urfi Javed slams Jaya Bachchan for being arrogant, Says- ‘People don’t respect you because you’re an elder’)

मीडियाचे प्रतिनिधी आणि फोटोग्राफर्स यांच्याशी सदैव भांडण करत असल्याने जया बच्चन सदैव चर्चेत असते. त्यामुळे तिच्यावर लोक टीका करतात. तरी पण पापाराझींना बघून तिचा राग अनावर होतो. अलीकडेच अशा भांडणावरून ती पुन्हा चर्चेत आली. अन्‌ युजर्स तिची निंदा करत आहेत. आता या भांडणात उर्फी जावेदने नाक खुपसले असून ती जया बच्चनवर जाम भडकली आहे.

सतत व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओत जया पापाराझींशी कडक भाषेत बोलताना दिसत आहे. ती आपली नात, नव्या नवेली नंदासह फॅशन वीक समारंभास गेली होती. तिथे गर्दी करत छायाचित्रकारांनी जयाचे धडाधड फोटो घ्यायला सुरुवात केली. तेव्हा तिने त्यांना कडक भाषेत सुनावले.

जया बच्चनचा हा व्हिडिओ आपल्या इन्स्टाग्रामवर टाकून लिहिले की, ‘तुम्ही पॉवरफुल आहात किंवा त्यांच्यापेक्षा मोठे आहात, म्हणून ते तुमचा मान राखतात असं समजू नका. तुम्ही त्यांच्याशी चांगले वागलात, तर तेही तुम्हाला सन्मानाने वागवतील.’

यानंतर उर्फीने त्यासोबत बराच मोठा मजकूर स्वतःबद्दल लिहिला आहे. त्यात ती म्हणते, “मी लोकांना आगंतुक सल्ले का देते, तेच मला कळत नाही. मग मी स्वतःच नावडती होते. मी स्वतःला आवरण्याचा खूप प्रयत्न करते, पण जमतच नाही. असा आगाऊपणा करून माझ्या हातून कामे जातात. पण मला गप्प बसवत नाही… पाचही बोटे सारखी नसतात, याची मला कल्पना आहे. पण प्रगती करण्यासाठी आपल्या सर्वांना संधी तरी मिळू शकतात ना! म्हणूनच आपण आवाज उठवला पाहिजे.”