आपल्या खासगी गोष्टी उलगडून दाखवत उर्फी जावेदने ...

आपल्या खासगी गोष्टी उलगडून दाखवत उर्फी जावेदने माजवली खळबळ (Urfi Javed Made Shocking Revelations About Her Personal Life)

आपल्या चित्रविचित्र, अंगोपांग उघडे टाकणाऱ्या फॅशनचे फोटो सोशल मीडियावर प्रसिद्ध करून उर्फी जावेद सतत चर्चेत असते. लोक तिच्यावर सपाटून टीका करतात, तरीही ती बिनधास्तपणे त्याच गोष्टी करत राहते. आता तिने आपल्या खासगी जीवनातील गोष्टी उलगडून दाखवत पुन्हा खळबळ माजवली आहे.

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम
एका मुलाखतीत उर्फीने सांगितले की, ११वीच्या वर्गात शिकत असताना तिचे फोटो फक्त प्रौढांसाठी असलेल्या साईटवर प्रसारित करण्यात आले. त्यामुळे तिच्या नातेवाईकांनी तिला पॉर्न स्टार म्हणून हिणवयाला सुरुवात केली. या फोटोंमुळे तिचे वडील देखील तिची अवहेलना करू लागले होते.

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम
उर्फीला ट्रॉलर्स नेहमीच लक्ष्य करतात. त्यातच एकदा तिनं बॉम्बगोळा टाकला की, मी इस्लाम मानत नाही. त्याचे कारण सांगत ती बोलली की, धर्माच्या बाबतीत लोकांच्या ज्या अपेक्षा असतात, त्याप्रमाणे माझे आचरण नाही. असंच एकदा तिला विचारलं गेलं होतं की, आपल्या समुदायाबाहेर जाऊन तू लग्न करशील का? तर उर्फी म्हणाली होती की, मी कधीच मुस्लीम मुलाशी  लग्न करणार नाही.

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम
इस्लाम धर्माबाबत वादग्रस्त विधाने करणाऱ्या उर्फीने एकदा असंही सांगितलं की, मी भगवतगीता वाचते. त्यामुळे ती फारच ट्रोल झाली. हा वाद जास्त वाढल्या नंतर तिने इन्स्टा स्टोरी शेअर करून सारवासारव केली होती.

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम
या संबंधात खुलासा करताना उर्फी बोलली होती की, मी सर्व जातीधर्माची आहे. जर तुम्ही हिंदू असून हिंदुचा द्वेष करत असाल, तर मी हिंदू आहे. जर तुम्ही मुस्लिमांचा द्वेष करत असाल तर मी मुस्लीम आहे. अलीकडेच उर्फीने ईद मुबारक अशी पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली होती. तेव्हा युजर्सनी तिला बोल लावला होता की,तू इस्लाम धर्म मनात नाहीस तर मग ईद कशी काय साजरी करतेस….

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम
लोक उर्फीवर टीका करतात तेव्हा ती पण लोकांचा समाचार घेते. सुझान खानची बहीण फराह खान अलीने तिच्या फॅशन सेन्सवर टीका केली तेव्हा तिने तिची निंदा केली होती. या वादात कश्मीरा शाहने उडी घेतली तर उर्फीने तिच्यावरही पलटवार केला होता.