उर्फी जावेदने घातला कोल्ड ड्रिंकच्या कॅनपासून ब...

उर्फी जावेदने घातला कोल्ड ड्रिंकच्या कॅनपासून बनवलेला क्रॉप टॉप, पाहा व्हायरल फोटो (Urfi Javed Made Dress From Cold Drink Can Cape, Watch Viral Video)

ज्या गोष्टी निरुपयोगी आहेत, त्या आपण कचरा म्हणून फेकून देतो. पण याच गोष्टी उर्फी जावेदसाठी खूप उपयुक्त ठरतात, उर्फी आपल्या विचित्र फॅशन सेन्समुळे आणि अतरंगी कपड्यांमुळे प्रसिद्धीच्या झोतात असते. दोरी, साखळी, फोन आणि टेपने बनवलेले कपडे परिधान केल्यानंतर आता उर्फीने कोल्ड ड्रिंक कॅन कॅपपासून बनवला टॉप तयार केला आहे.

अलीकडेच उर्फी जावेदने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे, या व्हिडिओमध्ये ती सर्वात आधी कोल्ड ड्रिंक पिते नंतर मग ती त्या टिनची कॅप काढते. आणि मग अचानक तिला त्या कॅपपासून ड्रेस तयार करण्याची भन्नाट कल्पना येते. मग उर्फीने कॅनच्या कॅपपासून एक टॉप बनवून त्याचे प्रदर्शन केलेले आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळते.

व्हायरल व्हिडिओमध्ये, अभिनेत्रीने काळ्या ब्रालेट आणि जीन्ससह कॅनच्या कॅपपासून बनवलेला क्रॉप टॉप घातला आहे. अभिनेत्रीने आपल्या केसांनी एक उंट स्लीक बन बनवला आहे. कमीतकमी मेकअपसह तिने आपला लूक पूर्ण केला. केशरी रंगाच्या लिप शेडने तिचे सौंदर्य खुलवले आहे.

नेहमीप्रमाणे यावेळीही उर्फी जावेदने आपल्या विचित्र ड्रेसने लाइमलाइट लुटली आहे. याआधीही अभिनेत्रीने सिमकार्ड, मोबाईल फोन, सायकल चेन, टेप, गुलाबाची फुले, सेफ्टी पिन, काचेच्या तुकड्यांपासून बनवलेले कपडे घातले होते.

हे कपडे परिधान करून उर्फीला खूप लोकप्रियता मिळाली, तिची फॅन फॉलोइंग देखील खूप वाढली, परंतु तिला खूप ट्रोलिंगचा सामना करावा लागतो.