उर्फी जावेदने साधला चेतन भगतवर निशाणा, म्हणाली ...

उर्फी जावेदने साधला चेतन भगतवर निशाणा, म्हणाली आपल्यापेक्षा अर्ध्या वयाच्या मुलींना मेसेज करतो….(Urfi Javed Leaks WhatsApp Chat Of Chetan Bhagat With A Women, Chetan Bhagat reacts and clarifies)

आपल्या विचित्र कपड्यांमुळे सोशल मीडियावर सतत चर्चेत असणारी उर्फी जावेद अनेकदा आपल्या बोल्ड फॅशनमुळे युजर्सच्या निशाण्यावर असते. काही दिवसांपूर्वीच प्रसिद्ध लेखक चेतन भगत यांनी एका कार्यक्रमादरम्यान उर्फी जावेदबद्ल वादग्रस्त वक्तव्य केले त्यामुळे त्या दोघांमध्ये सोशल मीडियावर भांडणे सुरू झाली आहेत. उर्फीने चेतन भगतचे MeToo प्रकरणासंदर्भातील चॅट लीक केले आहेत.

काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात चेतन भगत यांनी तरुणांना पुस्तके वाचण्याचा सल्ला देताना ते म्हणाले होते की, “इंटरनेट ही चांगली गोष्ट आहे, पण त्यामुळे आपली तरुणाई कमकुवत झाली आहे. मुलं दिवसभर मोबाईलमध्ये रील बघत राहतात. फोटो लाईक करतात. उर्फी जावेदच्या फोटोंना तरुणाई भरभरुन लाइक करते. मला उर्फीचे सगळे कपडे माहीत आहेत. ही उर्फीची चूक नाही. ती आपलं करीअर घडवत आहे. लोक अंथरुणात शिरून उर्फीचे फोटो बघत असतात. मी सुद्धा आज इथे उर्फीचे फोटो पाहून आलो आहे. आज तिने दोन फोन परिधान केले आहेत.

या प्रकरणामुळे उर्फीचा राग अनावर झाला. इतकेच नाही तर तिला चेतन भगतचे MeToo प्रकरणा संबंधित चॅट कुठून तरी सापडले आणि ते तिने सोशल मीडियावर शेअर करत लिहिले, “तुम्ही जेव्हा इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअॅपवर तुमच्यापेक्षा अर्ध्या वयाच्या मुलीला मेसेज करत होता तेव्हा कोण तुमची दिशाभूल करत होतं?” उर्फीने चेतन भगतला बलात्कार संस्कृतीला प्रोत्साहन देऊ नका असे म्हटले.

उर्फीच्या या पोस्टनंतर चेतन भगतच्या लैंगिक छळाचा जुना मुद्दा पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. त्यामुळे त्यांना ट्रोल करण्यात येत आहे. याप्रकरणी चेतन भगत यांनी स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी ट्विटमध्ये लिहिले की, “मी कधीही कोणाशीही बोललो नाही. मी कोणाला भेटलो नाही आणि ओळखत नाही. मी हे कृत्य केले असे जे काही बोलले जात आहे. ते खोटे आहे, साफ खोटे. मी कधीही कोणावर टीका केली नाही. इन्स्टाग्रामवर वेळ वाया घालवण्याऐवजी फिटनेस आणि करीअरवर लक्ष केंद्रित करण्यासाठी लोकांना सल्ले देऊन मी चुकीचे केले आहे असे मला वाटत नाही.

2018 मध्ये MeToo चळवळीदरम्यान चेतन भगतची एक चॅट व्हायरल झाली होती, ज्यामध्ये एका लेखकाने त्यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप केला होता. त्यानंतर त्या लेखकाशी चेतन भगतच्या चॅटचे स्क्रीनशॉट व्हायरल झाले. आता उर्फीने तेच स्क्रीन शॉट्स शोधून संताप व्यक्त केला आहे.