उर्फी जावेद आणि कश्मीरा शाह यांच्यातील वादात रा...

उर्फी जावेद आणि कश्मीरा शाह यांच्यातील वादात राखी सावंतने उर्फीला दिला धडा- (Urfi Javed-Kashmera Shah Controversy: Rakhi Sawant Gives Advice To Urfi)

सध्या कश्मीरा शाह आणि उर्फी जावेद यांच्यात शाब्दिक बाचाबाची सुरू आहे. खरं तर या सगळ्या वादाची सुरूवात तेव्हा झाली जेव्हा सुझान खानची बहीण फराह अली खानने उर्फीच्या स्टाईल आणि कपड्यांबद्दल एक ट्विट केले. त्यात सुझानने लिहिले – ‘मी असे बोलल्याबद्दल माफी मागू इच्छिते परंतु, तिला असे कपडे परिधान केल्याबद्दल फटकारले पाहिजे. या मुलीला असे वाटते की, लोकांना तिची ड्रेसिंगची पद्धत आवडते. पण लोक तिची खिल्ली उडवतात, हे तिला कोणीतरी सांगावे अशी माझी इच्छा आहे.’

यावर उर्फीनेही उत्तर देताना म्हटले की, ‘तुम्ही डिझायनर आहात, तुमच्या इथे सर्व सेलिब्रिटी आहेत पण तुमच्या मते टेस्टफुल ड्रेसिंग म्हणजे काय? लोकांना माझी स्टाईल आवडत नाही, हे मला माहीत आहे परंतु, मला त्याने काहीच फरक पडत नाही. घटस्फोट झाल्यामुळे तुझ्या बहिणीने पुरुषांना डेट करणे थांबवले की काय? (येथे उर्फी सुझान खानच्या अर्सलान गोनी आणि हृतिकसोबतच्या घटस्फोटा संदर्भात बोलत होती)

यानंतर कश्मीरा शाहनेही एका मुलाखतीत उर्फीबद्दलचा राग ओकताना म्हटले की, ती फक्त इंस्टाग्रामवर प्रसिद्ध आहे, मला अशा लोकांबद्दल बोलायचे नाही आणि त्यांना मी ओळखतही नाही ज्यांच्या बायोडेटा शून्य आहे. मी काम करत आहे, चित्रपट बनवत आहे… सुझान आणि फराह देखील कोणाबद्दल वाईट बोलणार नाहीत, पण त्यांनी तुझ्यासारखी फॅशन पाहिलेली नसणार…

कश्मीराच्या या वक्तव्यानंतर उर्फी आणि कश्मीरा यांच्यात जोराचंच वाजलं. उर्फीनं सांगितलं की, ती करत ​​असलेल्या विधानात काहीच तथ्य नाही. ती म्हणते, मी इंस्टाग्रामवर प्रसिद्ध आहे, वास्तविक जीवनात नाही, तुम्ही दोन्ही ठिकाणी नाही. काय उपयोग? इतकंच नाही तर उर्फीने कश्मीराविषयी असंही म्हटलं होतं की, तू फराह खानची इतकी प्रशंसा करत आहेस, कसे वाटते… कश्मीरा बॉलिवूडच्या लोकांच्या मागे-पुढे करत असते, असा आरोप उर्फीने केला आहे.

या संपूर्ण वादासंबंधी जेव्हा पॅपने राखी सावंतला विचारले तेव्हा राखी म्हणाली – उर्फी, तू एवढी का चिडते आहेस. मी पाहिलं, तू वापरलेली भाषा मला आवडली नाही. मीडिया हे असे एक माध्यम आहे की, जे तुम्हाला पुढे नेते, खुर्चीवरही बसवते आणि खाली फेकते. मीडियाशी नेहमी चांगले वागा. बॉलीवूडमध्ये चांगले राहा. जनतेशी चांगले वागा… सर्वांशी चांगले वागा. तू नुकतीच इंडस्ट्रीत अवतरली आहेस. आपण कोणाशीही पंगा घेऊ नये. आपल्या मैत्रीपूर्ण संबंधाने पुढे जायचे आहे.