निंदकांची उर्फी जावेद वर विकृत टीका: म्हणताहेत-...

निंदकांची उर्फी जावेद वर विकृत टीका: म्हणताहेत-‘ मुसेवालाच्या ऐवजी तुला गोळी लागायला हवी होती’ : उर्फीने घेतला त्यांचा खरपूस समाचार (Urfi Javed hits back on hate comments on social media,Trolls say ‘should’ve been shot dead instead of Sidhu Moosewala’)

सोशल मीडियावर आपल्या अतरंगी फोटोंनी धुमाकूळ घालणारी उर्फी जावेद कायम चर्चेत राहते. आपल्या चित्रविचित्र कपड्यांनी आणि बोल्ड लूकने ती ट्रोलर्सला टिकेची संधी देत असते. तिच्या या बोल्ड पोस्टवर ते लोक भयंकर शेरे मारत असतात.

एकीकडे पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला याच्या हत्येने संगीतक्षेत्र आणि त्याच्या चाहत्यांना दु:खात लोटले आहे. कित्येक लोक त्याच्या मृत्युबाबत शोक व्यक्त करत आहे. तर दुसरीकडे काही लोक उर्फी जावेदवर घसरले असून तिला फैलावर घेतले आहे.

त्यांच्या या टिकेने विकृत रुप धारण केले आहे. ते म्हणताहेत की, मुसेवालाच्या जागी उर्फी मरण पावली असती तर बरं झालं असतं.
उर्फीचा तिरस्कार करत युजर्सनी आपल्या पोस्ट दिल्या आहेत. एक जण लिहितो- ‘मुसेवालाच्या ऐवजी हीच जायला पाहिजे होती.’ तर दुसरा लिहितो- ‘ जी गोळी मुसेवालास लागली नं, ती तुला लागायला हवी होती.’ आणखी एक जण म्हणतो -‘ तू मेलीस नं तर कुत्रा देखील रडायचा नाही’ .याशिवाय काही लोकांनी उर्फीला कैदाशिण (चुडैल) म्हणत शिवराळ भाषा वापरली आहे.

तिरस्कारांनी भरलेल्या या शेरेबाजीवर उर्फी जाम भडकली आहे. तिने या भयंकर कमेंटसचे स्क्रीनश़ॉट आपल्या इन्स्टा स्टोरीवर शेअर करुन त्यांचा खरपूस समाचार घेतला आहे. ती म्हणते-‘कोणाच्याही मरणामध्ये मी इन्व्हॉल्व नाही. (दिवंगत आत्म्याला शांती लाभो) पण ज्या प्रकारे लोक माझे मरण बघू इच्छितात, ते भयावह आहे.

‘ ती पुढे लिहिते-‘ गेल्या काही दिवसात मला जे कमेंटस् मिळालेत ते मी शेअर करते. मी मेले असते तर बरे झाले असते किंवा मला कोणीतरी गोळी मारायला हवी होती, असे त्यांना वाटते. आपण किती निर्दयी आहोत बघा. मात्र मी तुम्हा सगळ्यांना सांगू इच्छिते की माझ्या मरणाची इच्छा खूप मनापासून करा. कारण मी कुठेच जाणार नाही. इथेच राहणार आहे.’

आपल्या या पोस्टच्या माध्यमातून उर्फी जावेदने आपल्या ट्रोलर्स वर पलटवार करुन त्यांची बोलती बंद केली आहे.