आपल्या टॉपलेस फोटोने उर्फी जावेदने लोकांना गोंध...

आपल्या टॉपलेस फोटोने उर्फी जावेदने लोकांना गोंधळात टाकले. तेव्हा चाहते करवादले – हिला मेंटल हॉस्पिटलात पाठवा… (Urfi Javed Goes Topless In Her Latest Reel, But With A Twist)

उर्फी जावेदने पुन्हा एकवार अती धाडस करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. काही दिवसांपूर्वीच तिने पारदर्शक लेयरच्या आत बिकिनी घालून आपल्या अजब अवाताराने चर्चा घडवली होती. आता तिने गडद निळ्या रंगातील आऊटफिटमध्ये एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्यात तिची उघडी पाठ दिसते आहे. खाली तिने रॅप अराऊंड लांब स्कर्ट घातला आहे. वरचा भाग टॉपलेस दिसत असल्याने असं वाटतंय्‌ की, तिने टॉप घातलेलाच नाही.

सगळ्यांना वाटत होतं की, व्हिडिओ असाच थांबेल. पण उर्फी कॅमेऱ्याकडे वळली. अन्‌ आश्चर्याची गोष्ट म्हणजे तिने बिकिनी टॉप किंवा ब्रा टॉप म्हणा हवं तर – तो घातला आहे. म्हणजे तिचा हा टॉप बॅकलेस होता – ज्यामुळे असा भ्रम झाला की तिनं वरच्या अंगात काहीच घातलं नाही.

हा व्हिडिओ पाहून लोक थक्क झाले खरे. पण ते बोलले की, आम्ही तर काही वेगळंच समजलो होतो… काही चाहते बोलले, ‘हिला मेंटल हॉस्पिटलात पाठवा…’ आणखी एक जण लिहितो, ‘ही फसवणूक आहे. आपल्या चाहत्यांना असा धोका देऊ नये…’