झोपाळ्यावर नाचताना उर्फी जावेद तोल जाऊन पडली, त...

झोपाळ्यावर नाचताना उर्फी जावेद तोल जाऊन पडली, तर युजर्स बोलले,’अब और कितना गिरोगी….?’ (Urfi Javed Falls Down From Swing While Shooting A Song, Netizens Say ‘Ab Aur Kitna Girogi…’)

उर्फी जावेद सध्या सोशल मीडियावरील सतत चर्चिला जाणार विषय बनली आहे. लोकांचे लक्ष सतत आपल्यावर खिळून राहावे यासाठी ती सतत काही ना काहीतरी करत असते. आपल्या विचित्र फॅशनद्वारे ती चर्चेत राहण्याचा प्रयत्न करत असते. तिच्याबाबतीत पुन्हा एकदा तसंच घडलं आहे. पण यावेळी तिच्या फॅशनमुळे नाही तर ती आपल्या डान्स व्हिडिओमुळे चर्चेत आहे.

उर्फीने आपल्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे.त्यात ती झोपाळ्यावर उभी राहून मादक डान्स करत असते. तिच्या आजुबाजुला काही मुलं डान्स करत असतात. पण अचानक तिचा पाय सरकून तोल जातो आणि ती खाली पडते. तेव्हा तिच्या आजुबाजुला असलेल्या मुलांनी तिला सावरले.

हा व्हिडिओ तिच्या हाय हाय मजबुरी या म्युझिक व्हिडिओमधील एका सीनचा आहे. बीटीएस व्हिडिओ शेअर करत तिने कॅप्शनमध्ये लिहिले की, ये तो सच का हाय हाय हो गया था… उर्फीने ही घटना सुद्धा हलक्यात घेतली. उर्फीने हा व्हिडिओ शेअर करताच तो तुफान व्हायरल झाला. व्हिडिओमध्ये ती शूटिंग दरम्यान डान्स करत असतानाच धडपडते आणि खाली पडते तितक्यात तिला आजुबाजुची मुलं सावरतात.

युजर्स या व्हिडिओवर कमेंट करत आहेत. उर्फीचे चाहते नशीब तुला दुखापत झाली नाही तू सुरक्षित आहेस अशी कमेंट करत आहेत.तर अनेकजण उर्फीची खिल्ली उडवत  कमेंटमध्ये तू आधीच एवढी खाली पडलेली आहेस. आणखी किती पडशील असे म्हणत आहेत. एकाने म्हणून एवढी ओव्हर अॅक्टिंग करु नये असे लिहिले, तर आणखी एकाने झोपळ्याला सुद्धा तुला सांभाळता आलं नाही अशी कमेंट केली आहे. सोशल मीडियावर लोक या व्हिडिओमुळे तिची मजा घेत आहेत.