उर्फीने केला आपल्या बेडरुम सिक्रेट्सचा खुलासा(U...

उर्फीने केला आपल्या बेडरुम सिक्रेट्सचा खुलासा(Urfi Javed Discloses Her Bedroom Secrets)

बिग बॉस ओटीटी फेम उर्फी जावेद आपल्या अतरंगी फॅशन सेन्ससाठी सोशल मीडियावर प्रसिद्ध आहे. तिच्या चित्रविचित्र कपड्यांमुळे ती अनेकदा ट्रोलही होते. तर काहीजण तिच्या आत्मविश्वासाचे कौतुक करतात. तर काहीवेळा सतत होणाऱ्या ट्रोलिंगमुळे ती सर्वत्र चर्चेचा विषय बनते. उर्फी जावेद आपल्या ड्रेसिंग सेन्ससोबतच आपल्या सडेतोड बोलण्यासाठीही प्रसिद्ध आहे. काही दिवसांपूर्वीच तिने तिचे बेडरुम सिक्रेटस् आपल्या चाहत्यांसोबत शेअर केले.

एमटीव्ही स्प्लिट्सविलाच्या शल मीडिया पेजवर एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडिओत उर्फी काचेचे भांडे घेऊन बसलेली पाहायला मिळते. त्या काचेच्या भांड्यात असणाऱ्या निळ्या रंगाच्या बॉल्सवर काही प्रश्न लिहिले आहेत. त्या प्रश्नाची उत्तरे उर्फी व्हिडिओत देत आहे.

उर्फी पहिला प्रश्न वाचते की तू बेडवर शांत आहेस का? या प्रश्नाचे उत्तर देताना उर्फी सुरुवातीला हसते आणि मग म्हणते की, बेडवरील गोष्टी बेडपर्यंतच राहिल्या तर चांगलं होईल. तुम्हाला जाणून घ्यायचे असेल तर या माझ्या बेडवर. उर्फी पुढील प्रश्न वाचते की, एखादी व्यक्ती जी तुला धोका देत आहे अशा व्यक्तीसोबत तू राहशील का?

यावर उर्फी म्हणाली की असं झालं तर मी त्याचा प्रायव्हेट पार्ट कापून टाकीन. उर्फी जावेदने तिसरा प्रश्न वाचला, तुला बघायला आवडते की बघितले गेलेले ? यावर उर्फी म्हणली, मला तर संपूर्ण जग पाहतं.

 उर्फी जावेद सध्या सनी लिओनीच्या स्प्लिट्सविला शोच्या 14 व्या सीझनमध्ये स्पर्धक म्हणून दिसत आहे.