‘ओ हसीना जुल्फोवाली…’ गाण्यावर उर्फी जावेदचा भन...

‘ओ हसीना जुल्फोवाली…’ गाण्यावर उर्फी जावेदचा भन्नाट डान्स (Urfi Javed Dance On ‘O Hasina Julfowali’, viral video)

सोशल मीडियावर आपल्या अतरंगी फॅशन सेन्समुळे नेहमीच सगळ्यांना हैराण करून सोडणारी उर्फी जावेद (Urfi Javed) लोकांचं लक्ष आपल्याकडे वेधून घेण्यासाठी काय काय करेल काही सांगता येणार नाही. तिच्या कपड्यांमुळे नेहमीच तिच्यावर टिकेचा वर्षाव होतो. पण ती कोणाची पर्वा करत नाही, उलट ट्रोलर्सना उत्तर देऊन शांत करते. असो, पण आता ती तिच्या कपड्यांमुळे नाही तर चक्क डान्समुळे प्रसिद्धी पावली आहे. तेही एका गाजलेल्या जुन्या गीतावर. तिचा हा व्हिडिओ सध्या भन्नाट व्हायरल होत आहे.

उर्फीने यावेळी कोणते विचित्र कपडे घातले नाहीत, तर ‘ओ हसिना जुल्फोवाली’ या गाण्यावर डान्स करून व्हिडियो शेअर केला आहे. हा डान्सही तिने आपला ड्रेस दाखविण्यासाठीच केला आहे. तिने निळ्या रंगाचा ड्रेस घातला आहे, ज्याच्या मागे दोऱ्यांनी हा ड्रेस पूर्ण झाला आहे. तसेच ड्रेसच्या अर्ध्या भागात निळ्या रंगाचे फर लावले आहे.

या व्हिडिओला उर्फीने ‘मी काही डान्सर नाही. फक्त हा ड्रेस माझ्यावर खूप खुलून दिसतोय म्हणून मी नाचले’ अशी कॅप्शन दिली आहे. उर्फीच्या या व्हिडिओला नेटकऱ्यांचा जोरदार प्रतिसाद मिळाला आहे.

(फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)