उर्फी जावेद-चाहत खन्ना यांच्यात झडली पुन्हा चकम...

उर्फी जावेद-चाहत खन्ना यांच्यात झडली पुन्हा चकमक : ‘तू बायको किंवा आई बनण्याच्या लायकीची नाहीस’ – चाहतने उर्फीला सुनावले खडे बोल…(Urfi Javed-Chahatt Khanna fight resumes again, Chahat hits back at Urfi, ‘Biwi ya maa banane layak nahin, semi nude…’)

उर्फी जावेद आणि चाहत खन्ना यांच्यातील चकमक थांबण्याचं चिन्ह काही दिसत नाही. त्या दोघी एकमेकांवर राळ उडवण्याची एकही संधी सोडत नाहीत. गेले काही दिवस दोघींच्याही आघाडीवर सामसूम होती खरी. पण उर्फी जावेदने, सुकेश चंद्रशेखर प्रकरणात चाहत खन्नाला ‘गोल्ड डिगर’ म्हणत तिची कळ काढली. तेव्हा चाहतने देखील तिची खिल्ली उडवत म्हटलं की, ‘तू कोणाचीही बायको अथवा आई बनण्याच्या लायकीची नाहीस.’

पैशांच्या अफरातफरीच्या प्रकरणात आता चाहत खन्नाचे पण नाव घेतले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार चाहत सुकेश चंद्रशेखरला तुरुंगात भेटायला गेली होती. शिवाय त्याच्याकडून महागड्या भेटवस्तू घेतल्या होत्या. ‘या साऱ्या बातम्या वाचून मला हसू आवरत नाही. अन्‌ त्यावर मला कोणतीच सफाई द्यायची नाहिये.’ यावर उर्फीने चाहतच्या विरुद्ध बरीच गरळ ओकली.

उर्फी म्हणाली, ‘तुझ्या घटस्फोटावरून मी जे काही वक्तव्य केलं, त्याबद्दल मी सॉरी म्हटलं. एका रॅन्डम इसमाकडून पैसे घेण्यासाठी जेलमध्ये जाऊन त्याला भेटतेस, अगबाई, माझी तुझ्याशी स्पर्धाच नाही. गोल्ड डिगर या नावानेच तू हमेशा ओळखली जाशील. तर मी एक विचित्र कपडे घालणारी मुलगी म्हणून. ते मला चालेल.’

उर्फीच्या या वक्तव्यावर चाहतने पलटवार केलाच.

आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर पोस्ट देत ती म्हणाली, ‘खरं काय आहे, ते जाणून घेण्याऐवजी, निव्वळ प्रसिद्धी मिळविण्यासाठी वादात उडी घेणं मूर्खपणा आहे. अक्कल नसलेलीशी वाद न घालणेच बरे. हिला अक्कल असती तर काही काम केलं असतं. शूटिंग केलं असतं, असं सेमी न्यूड वावरली नसती. काही हरकत नाही. तू तर आन्टी, बाई किंवा आई होण्याच्या लायकीची नाहीस. आता अन्य कोणाला आन्टी म्हण आणि खूश राहा. अल्लाह तूला थोडी अक्कल देईल तर बरे होईल.’

दोघींच्या या पोस्ट वाचून, या दोघी पुन्हा एकमेकींशी भिडल्या असल्याचं दिसून येतं. त्यांच्यात खडाजंगी होतच राहील. अन्‌ नेटकऱ्यांचं छान मनोरंजन होईल.