सारा जान्हवीला मागे टाकत उर्फी जावेद बनली 2022 ...

सारा जान्हवीला मागे टाकत उर्फी जावेद बनली 2022 मधील गुगलवर सर्वाधिक वेळा सर्च केली जाणारी आशियातील सेलिब्रेटी (Urfi Javed Beats Sara Ali Khan And Janhvi Kapoor To Become The Most Search Asian Celeb Globally)

गुगलने नुकतीच ‘मोस्ट सर्च एशियन 2022’ ची यादी जाहीर केली आहे. या यादीत उर्फी जावेदने सारा अली खान, जान्हवी कपूर आणि शिल्पा शेट्टीसारख्या अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींना टक्कर दिली आहे. उर्फी जावेदचे नाव ‘मोस्ट सर्च एशियन 2022’ च्या यादीत 43 व्या क्रमांकावर आहे. तर इंडस्ट्रीतील सारा अली आणि जान्हवीची नावे या यादीत खूप खाली आहे.

आपल्या विचित्र फॅशन सेन्स आणि स्पष्टवक्तेपणामुळे नेहमीच चर्चेत राहणारी उर्फी जावेद संपूर्ण जगात सर्वाधिक सर्च केली जाणारी सेलिब्रिटी बनली आहे. बिग बॉस OTT पासून लोकप्रिय झालेल्या उर्फी जावेदने 2022 मध्ये सारा अली खान, जान्हवी कपूर आणि दिशा पटणी, शिल्पा शेट्टी, अनुष्का शर्मा यांसारख्या बॉलिवूड अभिनेत्रींनाही मागे टाकले आहे.

उर्फी जावेद 2022 मध्ये संपूर्ण जगात सर्वाधिक शोधली जाणारी सेलिब्रिटी बनले आहे. पण हे काही पहिल्यांदाच घडलेलं नाही. याआधीही उर्फीने दोनदा आशियातील सर्वाधिक सर्च केलेल्या सेलिब्रिटींच्या यादीत स्थान मिळवले आहे.

या यादीत ती 43 व्या क्रमांकावर आहे. तर अनुष्का शर्मा 50 व्या, जान्हवी कपूर 65 व्या, अनुष्का शेट्टी 47 व्या, सोनाक्षी सिन्हा 53 व्या, पूजा हेगडे 56 व्या, शिल्पा शेट्टी 59 व्या, कियारा अडवाणी 60 व्या, क्रिती सेनन 85 व्या, सारा अली खान 88 व्या आणि दिशा पटणी 90 व्या क्रमांकावर आहे.

उर्फी जावेदने ‘मेरी दुर्गा’, ‘बेपनाह’ आणि ‘चंद्र नंदिनी’ यांसारख्या टीव्ही मालिकांमधून आपल्या करीअरची सुरुवात केली होती, परंतु उर्फी अभिनयात फारशी काही कमाल दाखवू शकली नाही. यानंतर ती बिग बॉस ओटीटीमध्येही दिसली होती. पण उर्फीला तिच्या  चित्रविचित्र फॅशन सेन्समुळे लोकप्रियता मिळाली.