उर्फी जावेदच्या निर्लज्जपणाचा कळस …. नको ...

उर्फी जावेदच्या निर्लज्जपणाचा कळस …. नको त्या ठिकाणी उघडली ड्रेसची झिप …. बघणाऱ्यांना वाटली लाज…. (Urfi Gets Trolled For Wearing Front Open Zip Dress : Trollers Say Zip Band Karane Ke Liye Hoti Hai)

चित्रविचित्र फॅशन करून सतत चर्चेत राहण्याची उर्फी जावेदला खोड आहे. कधी पॅन्टची झिप उघडून रस्त्यावर फिरते, तर कधी टीचभर आकाराचा टॉप घालून ब्रेसियरचं खुलेआम दर्शन घडवत एअरपोर्ट वर पोहचते….. या अजब चाळ्यांनी ट्रॉलर्स तिचा जाम धिक्कार करतात.

नुकताच तिने इन्स्टावर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे , त्यामध्ये आधी नाईट सुटात दिसते. अन मग अचानक तोकडया हिरवट ड्रेसमध्ये दिसते. या ड्रेसला पुढे झिप आहे. ती तिने भलत्या जागी उघडली आहे. त्यातून बरंच काही दिसत आहे.

असले वेडे चाळे करण्याबाबत उर्फी प्रसिध्द आहे. पण तिच्या या वेडया चाळ्यांवर ट्रॉलर्सनी तिखट प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकजण लिहितो, ‘झिप बंद करण्यासाठी असते ग!’  दुसरा म्हणतो, ‘डिसलाईक  असं काही बटण आहे का?’

युजर्स म्हणताहेत की, ‘असे विचित्र चाळे करण्यापेक्षा कपडे घालतेसच कशाला? थोडी तरी लाज बाळग!’ पण उर्फी त्यांची काहीच तमा बाळगत नाही.

याआधी उर्फीने असाच एक भयंकर विचित्र कळा  ड्रेस घातला होता. अमेरिकन मॉडेल केंडल जेनरच्या ड्रेसची तिने कॉपी केलेला हा ड्रेस होता. तेव्हा लोक म्हणाले होते, हिची केंडलशी तुलना करणे म्हणजे केंडलचा अपमान आहे.