कामाचा मोबदला चांगला मिळत असूनही उपासना सिंहने ...

कामाचा मोबदला चांगला मिळत असूनही उपासना सिंहने सोडला कपिल शर्मा शो (Upasana Singh Left ‘The Kapil Sharma Show ‘, Despite Of Good Earnings : Know Why)

अभिनेत्री उपासना सिंह सध्या ‘मासूम’ या वेब सीरिजमुळे चर्चेत आहे. या सीरिजमध्ये तिने बोमन इराणीच्या पत्नीची भूमिका साकारली आहे. त्यांची ही भूमिका एक गंभीर व्यक्तिरेखा आहे. याआधी उपासनाने अशा प्रकारची व्यक्तिरेखा कधीही साकारलेली नाही. उपासना गेल्या अनेक वर्षा्ंपासून इंडस्ट्रीमध्ये काम करत आहे. तिने अनेक वेगवेगळ्या भूमिकांमधून स्वतःचे नाव कमावले आहे. पण तिला विनोदी भूमिकांनी खरी ओळख मिळवून दिली. ती ‘द कपिल शर्मा शो’चाही एक भाग होती, पण 2 वर्षे या शोमध्ये काम केल्यानंतर तिने हा शो सोडण्याचा निर्णय घेतला.

उपासनाने सांगितले की, तिला या शो मध्ये काम करण्याचा चांगला मोबदला मिळत होता मात्र ती साकारत असलेल्या पात्रात तितकासा दम नसल्यामुळे तो शो सोडला. उपासनाच्या मते पैसा एका मर्यादेपर्यंत महत्वाचा असतो पण एका काळानंतर आपल्याला आपले समाधानच महत्वाचे वाटते.

उपासना सिंग पुढे म्हणाली, “मला फक्त अशाच भूमिका करायच्या आहेत ज्या मला चांगल्या वाटतात. मी नेहमी माझ्या निर्मात्यांना मला अशा भूमिका देण्यास सांगते ज्या कोणी साकारु शकत नाही. तशाच प्रकारची भूमिका मी कपिल शर्मा शोमध्ये करत होती, माझी ती भूमिका सलग 2-2.5 वर्षे टॉपला होती. मग एक वेळ अशी आली की त्या भूमिकेत तोच तोच पणा येऊ लागल्यासारखे मला त्यात करण्यासारखे फारसे काही नाही असे वाटू लागले. पण मला चांगले पैसे मिळत होते.”

उपासना सिंह पुढे म्हणाली, “मी कपिलला सांगितले की मला इथे करण्यासारखे फार काहीच नाही. त्यामुळे तू मला शोच्या सुरुवातीला मी जी भूमिका केली होती तशीच भूमिका दे. ती साकारायला मलाही खूप मजा आली होती.मी करत असलेल्या कामाचे मला खूप चांगले पैसे मिळत होते कारण आमचा शो खूप हिट झाला होता. मी शो सोडला असला तरी मी कपिल शर्माच्या संपर्कात आहे. आम्ही खूप चांगले मित्र आहोत. मी त्याला सांगून ठेवले आहे. जेव्हा शोमध्ये चांगले करण्यासारखे असेल तेव्हा मला परत फोन कर.