बालपणीचा वाईट काळ आठवून उर्फी जावेद भावूक, म्हण...

बालपणीचा वाईट काळ आठवून उर्फी जावेद भावूक, म्हणाली हे काम करुनच बरे वाटायचे (Uorfi Javed’s Pain Overflowed After Remembering Bad Phase of her Childhood, Said- I Used to Do This Work)

सोशल मीडिया सेन्सेशन, मॉडेल आणि अभिनेत्री उर्फी जावेद आपल्या बोल्ड स्टाईल आणि विचित्र फॅशनमुळे नेहमीच चर्चेत असते. ट्रोलर्सच्या निशाण्यावर असलेली उर्फी जावेद त्यांच्याकडे नेहमी दुर्लक्ष करते. उर्फीने तिच्या आयुष्यातील वाईट काळाबद्दलही अनेकदा सांगितले आहे. आपल्या वडिलांबद्दल धक्कादायक खुलासे केल्यानंतर उर्फी जावेदला नुकतेच आपल्या बालपणातील वाईट काळाबद्दल आठवून त्रास होत होता. यासोबतच तिने त्या काळात शांती मिळविण्यासाठी कोणते काम करायची हे सांगितले.

उर्फी जावेद उत्तर प्रदेशातील लखनऊ शहरातून आपली स्वप्ने साकार करण्यासाठी मुंबईत आली, मुंबईत तिने यशस्वी अभिनेत्री होण्यासाठी कठोर परिश्रम केले. उर्फीने अनेक शोमध्ये काम केले, परंतु त्यात तिला अपेक्षित यश मिळू शकले नाही. टीव्ही करीअरमध्ये यश न मिळाल्याने उर्फीने आपले बालपणापासूनचे आवडीचे काम सुरु केले.

अभिनयात प्रसिद्धी मिळवण्यात अपयशी ठरल्यानंतर उर्फीने फॅशन इंडस्ट्रीत पाऊल ठेवले आणि आपल्या अनोख्या पण विचित्र फॅशन सेन्ससाठी जगभरात प्रसिद्ध झाली. आज उर्फीचे नाव तिच्या फॅशन आणि विचित्र ड्रेसिंगसाठी खूप लोकप्रिय आहे. उर्फीला तिच्या कारकिर्दीतच नव्हे तर वैयक्तिक आयुष्यातही अनेक चढउतारांना सामोरे जावे लागले आहे.

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत उर्फीने आपल्या बालपणीच्या वाईट टप्प्याची आठवण करून दिली त्यावेळी ती खूप भावूक झाली. उर्फीने सांगितले की, वडिलांनी केलेल्या अत्याचारानंतरही मी कधीही हार मानली नाही. त्या काळात त्रासातून मुक्त होण्यासाठी फॅशनमध्ये शांतता मिळायची. एका इव्हेंटमध्ये उर्फीने सांगितले की तिचे बालपण अतिशय वाईट अवस्थेत कसे गेले याबद्दल खुलासा केला.

उर्फीने सांगितले की बालपणी तिला फक्त मेकअप करणे आणि कपड्यांमधून नवीन गोष्टी बनवणे याच गोष्टी चांगल्या वाटल्या. या गोष्टींमुळे तिला खूप दिलासा मिळाला. जेव्हा परिस्थिती बिकट असायची तेव्हा ती मेकअप करायची, नवीन डिझाइन केलेले कपडे घालायची आणि तयार झाल्यावर आरशात स्वतःला पाहायची.

याआधीही उर्फीने अनेकदा सांगितले आहे की, तिचे वडील तिला लहानपणी खूप मारायचे. वडिलांच्या अत्याचाराला कंटाळून तिने दोनदा आत्महत्येचा प्रयत्नही केला. एका अॅडल्ट साइटवर तिचा फोटो लीक झाल्याने तिचे आयुष्य उद्ध्वस्त झाले. वडिलांच्या अत्याचारापासून वाचण्यासाठी उर्फी आपले घर सोडून मुंबईला पळून गेली, आजच्या काळात उर्फीने स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.