उघडा टाकलेला उरोभाग हाताने झाकून उर्फी जावेदचे ...

उघडा टाकलेला उरोभाग हाताने झाकून उर्फी जावेदचे विचित्र फोटोशूट (Uorfi Javed Stuns With New Photo Shoot : Cover Her Expose Body Part With Hand )

सध्याच्या काळात सर्वात बोल्ड कोण असे कोणी विचारलं तर अनेकाच्या ओठांवर उर्फी जावेदचे नाव सहज येते. तिच्या विचित्र फॅशन सेन्समुळे सर्व फॅशन इंडस्ट्री हैराण झाली आहे. तिचे नेमाने नवनवीन अतरंगी फॅशन करुन पापाराझींच्या समोर उभी असते. तिच्या अतरंगी स्टाइलचे फोटो अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. काही लोक तिच्या फोटोंचे कौतुक करतात तर बहुतांश लोक तिला ट्रोल करत असतात.

तिच्या नुकत्याच समोर आलेल्या फोटोत तिने सर्व हद्द पार केली आहे. उर्फीला नेहमीच बोल्ड कपड्यांमध्ये दिसते. पण यावेळी तिने घातलेल्या कपड्यांमध्ये तिने आपल्या शरीराचा एक खास भाग हाताने झाकला होता. उर्फीने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर दोन फोटो शेअर केले ज्यात तिने पिवळ्या रंगाची ब्रा घातली होती.पण त्यात तिने बाजुची बाह्या आत दुमडून त्यावर हात ठेवला होता. तिच्या या फोटोवर अनेकजण हॉट अशी कमेंट करत आहेत.

उर्फी अतरंगीपणा करणार नाही असा एकही दिवस जात नाही. काही दिवसांपूर्वीच तिने इन्स्टाग्रामवर एक छोटासा व्हिडिओ शेअर केला होता. ज्यात तिने गुलाबाच्या पाकळ्यांनी तिचे शरीर झाकले होते. त्यावेळी तिने कपडेही घातले नव्हते. तिचा तो व्हिडिओ खूप व्हायरल झाला तिला अनेकांनी कमेंटमध्ये ट्रोलही केले पण त्याचा तिला काहीच फरक पडलेला नाही. पण तिच्या या लूकचे काही चाहतेही आहेत. ज्यांना तिला सतत बोल्ड आणि सेक्सी लूकमध्ये पाहायला आवडते.

कॉफी विथ करणच्या 7 व्या सीजनच्या पहिल्या भागात अभिनेता रणवीर सिंहने उर्फीचे खूप कौतुक केले होते. रणवीरच्या तोंडून आपले कौतुक ऐकून उर्फी खूप खुश झाली होती व तिने त्याचे आभार देखील मानले. बिग बॉस ओटीटी पासून उर्फी लाइमलाइटमध्ये आहे. बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यापासून ती खूप अंगप्रदर्शन करुन चर्चेत राहण्याचा प्रयत्न करत आहे