उर्फी जावेदने आपल्या वडीलांबद्दल केले धक्कादायक...

उर्फी जावेदने आपल्या वडीलांबद्दल केले धक्कादायक खुलासे: म्हणाली,त्यांच्यामुळे मी घर सोडले(Uorfi Javed Ran Away From Home due to Fear of Father, Has Made Shocking Revelations About Him)

‘बिग बॉस ओटीटी’ फेम उर्फी जावेद अनेकदा तिच्या विचित्र पोशाखामुळे चर्चेत असते. तिच्या ड्रेससाठी लोक तिला सोशल मीडियावर ट्रोल करतात, तरीही सोशल मीडियावर तिची बरीच फॅन फॉलोविंग आहे. सोशल मीडियावर उर्फी जावेदचे 4 मिलियन फॉलोअर्स आहेत. कपड्यांव्यतिरिक्त उर्फी तिच्या वैयक्तिक आयुष्यासाठी देखील प्रसिद्धीच्या झोतात राहते. मध्यंतरी तिने आपल्या वैयक्तिक आय़ुष्याबद्दल अनेक धक्कादायक खुलासे केले.

उर्फी जावेदच्या कुटुंबाबद्दल सांगायचे तर, तिच्या आईचे नाव झाकिया सुलतान असल्याचे सांगितले जाते. तिला तीन बहिणी आहेत, ज्यांची नावे डॉली, काना उरुषा आणि आसफी जावेद आहेत. तिला एक भाऊ आहे त्याचे नाव सलीम जावेद आणि वडिलांचे नाव इफ्रू जावेद आहे. उर्फीचे वडील लाइमलाइटपासून दूर राहणे पसंत करतात.

उर्फीने एका मुलाखतीत सांगितले होते की, ती तिच्या वडिलांना खूप घाबरते. त्यांच्या भीतीने ती एकदा घरातून पळून गेली होती. एवढेच नाही तर अभिनेत्रीने आपल्या वडिलांबाबत अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. वडील आपला मानसिक आणि शारीरिक छळ करत असल्याचे तिने सांगितले.

उर्फी म्हणाली की, तिच्या वडिलांनी सुमारे दोन वर्षे तिचा शारीरिक आणि मानसिक छळ केला होता. वडिलांच्या अत्याचारामुळे उर्फी नैराश्याची शिकार झाली होती. नैराश्यामुळे ती तिचे नावही विसरली. माझे वडील मला माझ्या नावाने नाही तर घाणेरड्या शिव्या देऊन हाक मारायचे असेही तिने सांगितले होते.

उर्फी जावेदचा जन्म लखनऊमधील मुस्लिम कुटुंबात झाला होता. तिने आपले शालेय शिक्षण सिटी मॉन्टेसरी स्कूल, लखनऊ येथून केले आणि नंतर तिने एमिटी युनिव्हर्सिटी, लखनऊ येथून मास कम्युनिकेशनमध्ये पदवी संपादन केली. शिक्षण पूर्ण केल्यानंतर उर्फीने दिल्लीत एका फॅशन डिझायनरची सहाय्यक म्हणून काम केले.

उर्फीच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर तिने 2015 मध्ये हिंदी टीव्ही शो ‘तेरी मेरी फॅमिली’मधून आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली. यानंतर, 2016 मध्ये तिने ‘बडे भैया की दुल्हनिया’ या मालिकेत अन्वी पंतची भूमिका साकारली, जी प्रेक्षकांना खूप आवडली. ‘बिग बॉस ओटीटी’मधून तिने प्रेक्षकांमध्ये चांगलीच लोकप्रियता मिळवली.