उर्फीनं रोहित शेट्टीच्या ‘खतरों के खिलाडी...

उर्फीनं रोहित शेट्टीच्या ‘खतरों के खिलाडी १३’ दिला नकार… (Uorfi Javed Left Khatron Ke Khiladi Season 13)

उर्फी जावेद नेहमीच तिच्या बोल्ड आणि अतरंगी फॅशन सेन्समुळे चर्चेत असते. मात्र, उर्फी तिच्या विचित्र ड्रेसिंग स्टाइलमुळे जितकी ट्रोल होते तितकीच ती प्रसिद्धी पावते. अलीकडेच, उर्फी ‘खतरों के खिलाडी १३’ च्या अपकमिंग सीझनमध्ये सामील झाल्याच्या बातम्या ऐकिवात होत्या. मात्र, उर्फीने ती या रिअॅलिटी शोच्या आगामी सीझनचा भाग नसल्याचे स्पष्ट केले आहे.

उर्फीच्या जवळच्या सूत्रांनी सांगितल्याप्रमाणे, उर्फी ‘खतरों के खिलाडी १३’ च्या टीमसोबत बऱ्याच दिवसांपासून चर्चा करत होती आणि तिलाही हा शो करण्याची खूप इच्छा होती. पण बॅडलकमुळे ती या शोचा भाग होऊ शकली नाही.

उर्फी एका मोठ्या प्रोजेक्टसाठी कोणाशी तरी बोलणी करत होती आणि ते खतरों के खिलाडीची ऑफर स्वीकारण्यापूर्वीच फायनल झाले होते, त्यामुळे तिला शो सोडावा लागला होता. अभिनेत्री तिच्या मोठ्या प्रोजेक्टबद्दल खूप उत्साहित आहे आणि लवकरच ही बातमी तिच्या चाहत्यांशी शेअर करणार आहे.

उर्फी तिच्या करिअरमध्ये उत्तम कामगिरी करताना दिसत आहे. ती अलीकडेच एका साऊथ मॅगझिनच्या डिजिटल कव्हरवर डिझायनर कपड्यांसह दिसली. ती प्रसिद्ध डिझायनर जोडी अबू जानी आणि संदीप खोसला यांच्या नवीन कलेक्शनची मॉडेल देखील बनली.

उर्फी शेवटची स्प्लिट्सविला X4 मध्ये मिसचीफ मेकर म्हणून दिसली होती. यावेळी हा शो सनी लिओनी आणि अर्जुन बिजलानी यांनी होस्ट केला होता.