उर्फी जावेदची तब्येत अचानक बिघडल्यामुळे मुंबईती...

उर्फी जावेदची तब्येत अचानक बिघडल्यामुळे मुंबईतील हॉस्पिटलमध्ये केले भरती (Uorfi Javed hospitalised due to high fever to undergo a few tests)

‘बिग बॉस OTT’ फेम उर्फी जावेद भलेही कोणत्याही मालिका किंवा चित्रपटात काम करत नसली तरी सुद्धा ती तिच्या अतरंगी कपड्यांच्या स्टाइलमुळे नेहमीच चर्चेत असते. ती बरेचदा पापाराझींना फोटोसाठी पोज देत असते, त्यांच्यासोबत मनमोकळेपणाने बोलते आणि अनेक मुद्द्यांवर आपले मत व्यक्त करताना दिसते.

भलेही ती तिच्या कपड्यांमुळे ट्रोल होत असली तरीही सोशल मीडियावर ती खूप सक्रिय असते. पण उर्फीच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. उर्फीची तब्येत अचानक बिघडली असून तिला तातडीने रुग्णालयात दाखल केले आहे.

उर्फीने तिचा हॉस्पिटलमधील एक फोटो शेअर केला आहे. त्यात ती हॉस्पिटलच्या बेडवर बसून जेवत आहे. या फोटोला कॅप्शन देत तिने म्हटले की, बरेच दिवस मी माझ्या तब्येतीकडे दुर्लक्ष केल्यामुळे माझ्यासोबत हे असं घडलं आणि आता…. माझ्याकडे इथे खूप वेळ आहे.

उर्फीला 104 ताप आहे, आणि तिला उलट्याही होत आहेत त्यामुळे उर्फीला रुग्णालयात भरती करण्यात आले. सध्या तिच्या वेगवेगळ्या टेस्ट केल्या असून त्याचे रिपोर्टस् यायचे बाकी आहेत.

उर्फीच्या एका जवळील व्यक्तीने सांगितले की, ती भलेही बाहेर जात होती, पापाराझींसमोर पोज देत होती, पण गेले दोन – तीन दिवस तिची तब्येत ठीक नव्हती. गेले काही दिवस तिला उलट्यांचा त्रास होत होता. तसेच तिला 103-104 इतका तापही होता. तब्येत जास्तच बिघडत गेल्यामुळे तिला मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करावे लागले.

उर्फी जावेद सध्या सर्वसामान्य लोकांमध्येच नाही तर सेलिब्रेटींमध्ये सुद्धा प्रसिद्ध झाली आहे. रणवीर सिंह, मसाबा गुप्ता यांसारख्या सेलिब्रेटींनी तिच्या फॅशन सेन्सचे कौतुक केले. तसेच उर्फी बिग बॉस १६ मध्ये सुद्धा सहभागी होऊ शकते असे म्हटले जात आहे.