स्पिट्सविलामध्ये उर्फी जावेद पडली या व्यक्तीच्य...

स्पिट्सविलामध्ये उर्फी जावेद पडली या व्यक्तीच्या प्रेमात, म्हणाली, माझा होकार आहे, तुझ्या आईला सुद्धा पटवीन….(Uorfi Javed finds dating partner on Splitsvilla X4, Says- ‘Maine toh haan kar di, I will convince your mother too’)

सोशल मीडियावर अभिनेत्री उर्फी जावेद आपल्या अजब फॅशन आणि कपड्यांमुळे नेहमीच चर्चेत असते. चाहते नेहमीच तिच्या बोल्ड अवताराची आणि नवीन फोटो-व्हिडिओची वाट पाहत असतात, त्यामुळेच उर्फीभोवती नेहमीच पापाराझींचा गराडा असतो. उर्फी सध्या आपल्या बोल्ड फोटोंमुळे नाही तर स्पिट्सविला X4 मुळे चर्चेत आहे. विशेष म्हणजे तिथे जाताच तिने स्वतःसाठी एक नवीन बॉयफ्रेंड देखील शोधला आहे.

उर्फी जावेदची ‘स्पिट्सविला X4’ मध्ये धमाकेदार एंट्री झाली आहे. उर्फीच्या स्पेशल एंट्रीपूर्वीच इतर मुलींना असुरक्षित वाटू लागलं होतं. उर्फीने शोमध्ये प्रवेश करताच मुलांचे पूर्ण लक्ष स्वत:कडे वेधून घेण्यास सुरुवात केली. या शोमध्ये आपण एका गोड आणि चॉकलेट बॉयसारख्या मुलाच्या शोधात आल्याचे तिने आधीच सांगितले होते. आता तिचा शोधही पूर्ण झाला आहे. ती कशिश ठाकूरच्या प्रेमात पडली असून तिने आपले प्रेमही व्यक्त केले आहे.

उर्फी जावेद रोडीज Xtreme चा विजेता कशिश ठाकूरच्या प्रेमात पडली आहे. ती म्हणाली,“मी खूप लवकर प्रेमात पडते, आणि आता तर मी प्रेमात पडली आहे. मी माझ्या भावना शेअर केल्या आहेत.” कशिश ठाकूरला प्रभावित करण्याचा प्रयत्न करताना उर्फी म्हणाली, “मी तरी होकार दिला आहे. आता तुझी पाळी. तुझ्या आईला पण पटवीन. मला माहित आहे की मी एक वादग्रस्त आणि मोकळ्या विचारांची मुलगी आहे, पण खरे सांगायचे तर खरी उर्फी आजपर्यंत कोणालाच माहीत नाही.

उर्फी या शोमध्ये अतिशय उत्तम खेळत आहे. तिला या शोची विजेती व्हायचे असल्यामुळे ती हुशारीने खेळत आहे

अलीकडे उर्फीला हिंदुस्थानी भाऊंनी धमक्या दिल्या होत्या. हिंदुस्थानी भाऊंनी एक व्हिडीओ शेअर केला होता, तू हे कपडे घालून बाहेर फिरतेस पण हे अतिशय चुकीचे आहे. तू हे सर्व थांबव नाहीतर मी तुला बरोबर करीन. याशिवाय प्रसिद्ध लेखक चेतन भगत यांनीही उर्फीबद्दल सांगितले होते की लोक बेडमध्ये शिरतात आणि उर्फी जावेदचा फोटो पाहतात.