रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोण यांच्या लग्नाचे अ...

रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोण यांच्या लग्नाचे अप्रकाशित फोटो : हाती शॅम्पेन घेऊन साजरा केला समारंभ (Unseen Pictures Of Deepika Padukone And Ranveer Singh’s Wedding : Couple Celebrating With Champaign)

रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोण हे बॉलिवूडचं लाडकं जोडपं आहे. त्यामुळे त्यांचे फोटो येताक्षणी व्हायरल होतात…

या दोघांच्या लग्नाला २ वर्षे पूर्ण झालीत. त्यांनी २०१८ साली इटली येथील लेक कोमो सिटीमध्ये आपला विवाह संपन्न केला होता. तेव्हा त्यांच्या लग्नाच्या फोटोंनी सोशल मीडियावर खूपच गहजब केला होता. आता याच लग्नाचे काही न पाहिलेले फोटो समोर आले आहेत. जे सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.

या फोटोज्‌मध्ये दोघांच्याही हातात शॅम्पेनचे चषक आहेत.

दुसऱ्या एका फोटोत ते बोटीमधून विवाह स्थळाकडे निघालेले दिसत आहेत.

दीपिकाने सोनेरी रंगाची साडी नेसली आहे तर रणवीर बारीक प्रिंट असलेल्या सफेद धोती-कुर्ता या वेषात दिसतो आहे.

वरील फोटो दीपिकाच्या विदाईचा आहे. ऑरेंज कलरच्या मोटारगाडीतून रणवीरसह तिने माहेरचा निरोप घेतला होता.

रणवीर आणि दीपिका यांच्या या अप्रकाशित फोटोंवर चाहत्यांच्या नजरा खिळून राहिल्या आहेत. त्यांच्या फॅन क्लबने हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले आहेत. जे सगळ्यांना खूप आवडले आहेत.