बॉलिवूड गायक उदित नारायण यांना ह्रदयविकाराचा झट...

बॉलिवूड गायक उदित नारायण यांना ह्रदयविकाराचा झटका आल्याची बातमी व्हायरल, जाणून घ्या कशी आहे त्यांची तब्येत(Udit Narayan Heart Attack Viral News, Know Truth About Singer’s Health)

बॉलिवूड गायक उदित नारायण यांच्याबद्दल सोशल मीडियावर एक अफवा पसरली आहे. गायक उदित नारायण यांना हृदयविकाराचा झटका आला असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे म्हटले जात आहे. ही बातमी व्हायरल झाल्यामुळे त्यांचे चाहते खूप काळजी करत आहे. त्यांच्या प्रकृतीसाठी सतत प्रार्थना करत आहेत. पण या अफवेमागील सत्य काहीतरी वेगळेच आहे.

आपल्या सुरेल आवाजाने चाहत्यांची मने जिंकणारे गायक उदित नारायण यांच्या हृदयविकाराच्या झटक्याची बातमी ट्विटरवर खूप वेगाने ट्रेंड करत आहे. ही बातमी वाचून त्यांचे चाहते आणि इंडस्ट्रीतील मित्र खूपच नाराज झाले आहेत. उदित नारायण यांची प्रकृती कशी आहे हे जाणून घेण्याची सर्वांनाच उत्सुकता आहे.

व्हायरल झालेल्या या बातमीवर गायकाच्या मॅनेजरचे वक्तव्य आले असून त्यांनी सांगितले की उदितजी पूर्णपणे बरे आहेत. त्यांना हृदयविकाराचा झटका आलेला नाही. ही बातमी केवळ अफवा असून ही अफवा कशी पसरली याबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही.

मॅनेजरने पुढे म्हटले की, आम्हाला वाटते की उदितजींना हृदयविकाराचा झटका आल्याची अफवा नेपाळमधून पसरवण्यात आली होती. कारण ज्या मोबाईल नंबरवरून हा मेसेज फिरवला जात आहे तो नेपाळचाच कोड नंबर आहे. या अफवा कुठून पसरल्या हे मला माहीत नाही. खुद्द उदितजीही या अफवेने खूप नाराज आहेत. त्यांचे चाहते आणि मित्र त्यांना सतत फोन करून त्यांच्या प्रकृतीबद्दल विचारत आहेत.

गायकाबाबत ही अफवा कोणी आणि का पसरवली हे अद्याप समजू शकलेले नाही. पण बॉलिवूड गायक उदित नारायण पूर्णपणे बरे आहेत.