‘उडन पटोलाज’ मध्ये चार बिनधास्त तरु...

‘उडन पटोलाज’ मध्ये चार बिनधास्त तरुणींची कॉमेडी, ड्रामा आणि रोमान्सचे मिश्रण (‘Udan Patolas’ Is Full Of Comedy, Drama And Romance Of Four Bold Young Girls)

अमेझॉनच्या शॉपिंग अ‍ॅपवरील फ्री व्हिडिओ स्ट्रिमींग सर्व्हिस असणार्‍या अमेझॉन मिनीटीव्हीवर त्यांचा आगामी शो ‘उड़न पटोलाज़’ च्या प्रिमियरची घोषणा करण्यात आली आहे. या शो चा प्रिमियर दि. 10 जून रोजी होणार आहे. एकूण 6 भागांच्या या शो मध्ये कॉमेडी, ड्रामा आणि रोमान्सचे एक अनोखे मिश्रण पहायला मिळेल. ही कथा आहे पंजाबमधून महानगरामध्ये आपली स्वप्ने घेउन आलेल्या चार महिलांची. शो ची कथा या चार मुलींचे आपापसातील नातेसंबंध, कामाच्या ठिकाणचे आयुष्य आणि त्यांच्या महत्वाकांक्षा या सभोवती फिरत राहते. या शो ची निर्मिती आहे अप्लॉज़ एंटरटेनमेंटची, ज्यांनी यापूर्वी स्कॅम 1992 या यशस्वी वेबसिरीजचीही निर्मिती केली होती. अप्लॉज़ एंटरटेनमेंटला साथ लाभली आहे सोल प्रोडक्शनची. उड़न पटोलाज़चे दिग्दर्शन केले आहे हातीम आणि रामायण फेम शक्ती सागर चोपड़ाने. उड़न पटोलाज़च्या माध्यमातून अपूर्वा अरोड़ा, आस्था सिदाना, पॉपी जब्बल आणि सुखमनी सदाना या अभिनेत्रींनी आपला लाजवाब अदाकारीचे प्रदर्शन केले आहे.

उड़न पटोलाज़विषयी माहिती देताना अमेझॉन एडव्हर्टायजिंगचे प्रमुख गिरीश प्रभू यांनी सांगितले की, “उड़न पटोलाज़ आजच्या पिढीतील भारतीय स्त्रियांचा आवाज प्रतिबिंबित करते, ज्या अत्यंत स्वतंत्र आहेत. त्या आपल्या मनातील गोष्ट स्पष्टपणे बोलण्यास घाबरत नाहीत आणि प्रत्येक क्षणात जीवन जगण्यावर विश्वास ठेवतात. ही एक मजेदार, संबंधित कथा आहे जी तुम्हाला तुमच्या जवळच्या मित्रांच्या ग्रुपची आठवण करून देईल. अप्लॉज़ एंटरटेनमेंटसोबत भागीदारी करताना आम्हाला आनंद होत आहे, जे नेहमीच काही तरी हटके कंटेंट विकसित करण्यासाठी ओळखले जातात. ‘उड़न पटोलाज़’ हा एक मजेदार अनुभव असेल आणि आम्ही आमच्या दर्शकांच्या प्रतिक्रियेची आतुरतेने वाट पाहत आहोत.”