अभिषेक बच्चनला ट्विटर युजरने बेरोजगार म्हणताच अ...

अभिषेक बच्चनला ट्विटर युजरने बेरोजगार म्हणताच अभिनेत्याने दिले करारी उत्तर (Twitter User Called Abhishek Bachchan ‘Unemployed’, Then The Actor Gave Such An Answer That He Had To Apologize)

बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो. इंस्टाग्राम सोबतच तो ट्विटरवरही पोस्ट करतो आणि अनेकदा तो लोकांच्या कमेंटला रिप्लायही करतो. इतकंच नाही तर ट्रोलर्सचा धडा कसा शिकवायचा हेही त्याला चांगलं माहीत आहे. एका ट्रोलरने अभिषेकला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला त्यावर त्याने असे काही उत्तर दिले ज्यामुळे त्या ट्रोलरला अभिषेकची माफी मागावी  लागली.

पालकी शर्मा नावाच्या पत्रकाराने सणांच्या जाहिरातींनी भरलेल्या वर्तमानपत्रांबद्दल ट्विट केले. याच ट्विटला उत्तर देताना अभिषेक बच्चनने लिहिले – तुम्ही अजूनही वर्तमानपत्र वाचता का? अभिषेकला पल्की शर्माकडून उत्तर मिळाले नाही, पण सी जैन नावाच्या युजरने लिहिले – बुद्धिमान लोक वाचतात. तुमच्यासारखा बेरोजगार नाही.

सी जैन नावाचा हा यूजर अभिषेक बच्चनला ट्रोल करत होता, मात्र अभिषेकने त्याला चांगलाच धडा शिकवला. सी जैनच्या ट्विटवर अभिषेकने पुन्हा ट्विट केले आणि लिहिले – अरे हो. इनपुटबद्दल धन्यवाद. बरं, बुद्धिमत्ता आणि नोकरीचा काही संबंध नाही.तुझचं बघं ना… तुझ्याकडे रोजगार आहे हे मी खात्रीने सांगू शकतो. पण तू हुशार नाही हेही मी पूर्ण खात्रीने सांगू शकतो. (तुझ्याच ट्विटवरून बोलतो.)

अभिषेक बच्चनच्या ट्विटने ट्रोलरची बोलती बंद केली. यानंतर, त्याने आपले ट्रोलिंग ट्विट झाकण्यासाठी पुन्हा ट्विट केले आणि लिहिले – उत्तरे मिळवण्यासाठीची निन्जा टेक्निक. मी तुम्हाला दुखावले असल्यास मला माफ करा.

अभिषेकची बहिण श्वेता बच्चन हिने आपल्या मुलीच्या पॉडकास्टवर भावाला ट्रोल केल्याबद्दल राग व्यक्त केला. श्वेता बच्चन म्हणाली की, अभिषेकची वडील अमिताभ बच्चन यांच्याशी तुलना करणे चुकीचे आहे. अशा ट्रोलिंगचा मला भयंकर राग येतो.