राजेश खन्ना यांच्या वाढदिवसानिमित्त ट्विंकल खन्...

राजेश खन्ना यांच्या वाढदिवसानिमित्त ट्विंकल खन्नाने शेअर केले आपल्या वडिलांसोबतचे फोटो(Twinkle Khanna Shares Cutest Childhood Pic With Rajesh Khanna On Birthday)

आज 29 डिसेंबरला सुपरस्टार राजेश खन्ना आणि त्यांची मुलगी ट्विंकल खन्ना यांचा वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्त ट्विंकल खन्नाने आपले वडील राजेश खन्ना यांच्यासोबतचा बालपणीचा एक अतिशय गोंडस फोटो शेअर केला आहे.

ट्विंकल खन्ना आज आपला ४९ वा वाढदिवस साजरा करत आहे. आज 29 डिसेंबरला ट्विंकल खन्नाचे वडील आणि इंडस्ट्रीतील सुपरस्टार राजेश खन्ना यांचाही वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्त ट्विंकलने सोशल मीडियावर वाढदिवसाच्या शुभेच्छांची पोस्ट शेअर केली आहे.

ट्विंकल खन्नाने पोस्ट केलेला ब्लॅक अॅण्ड व्हाइट फोटो तिच्या बालपणीचा आहे. हा फोटो शेअर करताना ट्विंकलने ते क्षण आंबट-गोड असल्याचे सांगितले आहेत. फोटोमध्ये ट्विंकलने फ्रॉक घातलेला पाहायला मिळतो. तसेच तिचे वडील राजेश खन्ना तिच्यासोबत खेळताना दिसत आहेत.

हा गोंडस फोटो आपल्या इंस्टाग्रामवर शेअर करत ट्विंकलने कॅप्शनमध्ये लिहिले- “वाढदिवसाचे गोड गोड क्षण आणि आयुष्यभराच्या आठवणी…”. अभिनेत्रीच्या या बालपणीच्या फोटोवर इंडस्ट्रीतील अनेक सेलिब्रिटींनी प्रेमाचा वर्षाव केला आहे. मलायका अरोरा ते बॉबी देओलपर्यंत सेलिब्रेटींनी या सुंदर फोटोंवर हृदयाचा इमोजी पाठवला आहे.

बॉलिवूड सेलिब्रिटींसह, सुपरस्टार राजेश खन्ना यांचे चाहते आणि ट्विंकल खन्नाच्या चाहत्यांनी या फोटोवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. ट्विंकलच्या या फोटोवर कमेंट करताना एका चाहत्याने लिहिले – माझ्या आयुष्यातील क्रशला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. मी 19 वर्षांचा होतो तेव्हा मी त्यांना आमच्या कॉमन फ्रेंडच्या घरी भेटलो होतो. सगळ्यात देखणे आणि मोहक… राजेश खन्ना आणि ट्विंकल यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.”

आणखी एका चाहत्याने कमेंट केली की. “मला विश्वास आहे की तू त्यांच्या आयुष्यातील खरे प्रेम होतीस.” त्याचप्रमाणे इतर अनेक चाहत्यांनी हॅपी बर्थडे ट्विंकल लिहून अभिनेत्रीवर आपले प्रेम दर्शवले आहे.