टीव्हीवरील किन्नर बहू फेम रुबिना दिलैकला प्रेक्...

टीव्हीवरील किन्नर बहू फेम रुबिना दिलैकला प्रेक्षकांनी केले ट्रोल, म्हणाला ही खूप नौटंकी करते (TV’s Kinnar Bahu Rubina Dilaik Trolled on Social Media, People Target her By Saying Nautanki)

टीव्हीवरील किन्नर बहू आणि ‘बिग बॉस 14’ची विजेती रुबिना दिलैक अनेकदा आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. काही दिवसांपूर्वीच ती स्टंटवर आधारित रिअॅलिटी शो ‘खतरों के खिलाडी 12’ मध्ये दिसली होती. आता रुबिना ‘झलक दिखला जा 10’ या डान्स रिअॅलिटी शोमध्ये आपल्या डान्सने प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसत आहे. नुकतेच या शोच्या आगामी भागाचे काही प्रोमो समोर आले आहेत, त्यातील एका प्रोमोमध्ये टीव्ही अभिनेत्री रुबिना दिलैकने आपल्या आयुष्याशी निगडित एक सत्य उघड केले त्यावेळी अभिनेत्री खूप भावुक झाली, पण तिला असे भावूक झालेले पाहून लोकांनी मात्र तिला नौटंकी असे म्हणत ट्रोल करण्यास सुरुवात केली.

 ‘झलक दिखला जा 10’ मध्ये रुबिना दिलैकने एक डान्स परफॉर्मन्स सादर केला त्या डान्समध्ये तिने आपलीच कहाणी सादर केली. या डान्सद्वारे तिने सांगितले की तिच्या आयुष्यात एक काळ असा आला होता जेव्हा ती आपला पती अभिनव शुक्लावर इतकी नाराज झाली होती की, तिला त्याच्यापासून घटस्फोट घेऊन त्यांचे नाते संपवायचे होते. तिच्या डान्सचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, तो पाहून सोशल मीडिया युजर्स अभिनेत्रीला ट्रोल करत आहेत. काही लोक म्हणतात की रुबिना फक्त नौटंकी करत आहे, तर काही लोकांचे म्हणणे आहे की तिने बिग बॉस जिंकण्यासाठी शोमध्ये पतीपासून घटस्फोट घेण्याबद्दल बोलले होते.

रुबिना दिलैकने ‘झलक दिखला जा 10’ मध्ये आपला पती अभिनव शुक्लाला हा परफॉर्मन्स समर्पित केला, या परफॉर्मन्सद्वारे तिने तिच्या वैवाहिक जीवनातील सत्य सांगितले. ‘बेखयाली’ गाण्यावरील परफॉर्मन्सदरम्यान, अभिनेत्रीने तिचे आणि पती अभिनव शुक्ला यांच्यातील भांडण आणि तणाव दाखवला. डान्स परफॉर्मन्समध्ये त्यांच्या लग्नाचा व्हिडिओही दाखवण्यात आला. तिच्या आयुष्यातील सर्वात कठीण टप्पा दाखवत रुबिना नृत्यादरम्यान म्हणते की आता खूप झाले, मी आता हे करू शकत नाही, मला घटस्फोट हवा आहे.

परफॉर्मन्स संपल्यानंतर, रुबिना खूप भावुक होते आणि आपल्या आयुष्यातील हे काळे सत्य सांगते, की तो तिच्या आयुष्यातील सर्वात कठिण काळ होता. याआधी ‘बिग बॉस 14’ मध्येही रुबिनाने पती अभिनव शुक्लासोबत घटस्फोट घेण्याची चर्चा केली होती, परंतु शोदरम्यानच दोघांनीही त्यांच्या नात्याला आणखी एक संधी देण्याचा निर्णय घेतला.

शोमध्ये रुबिना आणि अभिनव यांनी खुलासा केला की दोघांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आहे. दोघांनी घटस्फोटासाठी अर्ज केला आहे, मात्र कोर्टाने आम्हाला एकत्र राहण्यासाठी ६ महिन्यांची मुदत दिली आहे. या सहा महिन्यांत आमच्यात काही ठीक झाले नाही तर घटस्फोट होईल. मात्र, हळूहळू त्यांच्या नात्यात सुधारणा होऊ लागली आणि दोघांनी घटस्फोट न घेता एकत्र राहण्याचा निर्णय घेतला. आज दोघेही एकत्र आहेत आणि आपल्या वैवाहिक जीवनाचा आनंद घेत आहेत.

फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम