टीव्हीवरील मालिका मिठाई फेम अभिनेता आशिष भारद्व...

टीव्हीवरील मालिका मिठाई फेम अभिनेता आशिष भारद्वाज आणि त्याची पत्नी काजोलमध्ये आरोप-प्रत्यारोपांची खडाजंगी (Tv Show Mithai Fame Aashish Bhardwaj’s Wife Kajal Accuses Him Of Physical & Mental Torture, Actor Hits Back, Says- ‘She Scratched My Face And Now Demanding 75 Lakhs For Divorce’)

टीव्ही मालिका मिठाई फेम अभिनेता आशिष भारद्वाजने लग्न केल्याची बातमी काही दिवसांपूर्वी आली होती, पण आता त्याचे वैवाहिक आयुष्य खूपच गुंतागुंतीचे झाले आहे. त्याच्या वैवाहिक आयुष्यात अनेक चढउतार आले आहेत. अभिनेत्याची पत्नी काजल चोणकर हिने आपल्या पतीवर मानसिक आणि शारीरिक छळ केल्याचा आरोप केला आहे.

काजलने सांगते की, आम्ही तीन वर्षांपूर्वी प्रेमात पडलो होतो आणि मिठाई शो दरम्यान मी गर्भवती होती. आशिषला लग्नासाठी विचारले असता तो म्हणाला की, योग्य वेळ येऊ दे. नात्याबद्दल पालकांना सांगायचे असा विषय काढल्यावर बोलायचा आधी गर्भपात करून घे, नाहीतर पालक आपले नाते मान्य करणार नाहीत. त्याने मला गर्भपात करण्यास भाग पाडले आणि तेव्हापासून माझ्याकडे दुर्लक्ष करू लागला. मी आशिषच्या घरच्यांशी बोलले तेव्हा ते म्हणाले की, आशिषला माझ्याशी लग्न करण्यात रस नाही.

मी त्याच्याविरुद्ध पोलिसात तक्रारही केली असून त्याने लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याचा आरोप आहे. 9 सप्टेंबर 2022 रोजी मी वर्सोवा पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. यानंतर त्याच्या कुटुंबीयांनी माझ्याशी संपर्क साधला आणि आशिष लग्नासाठी तयार असल्याचे सांगितले.

मी त्यांच्या उत्तर प्रदेशातील खतौली गावात गेली होती तिथे आम्ही कोर्ट मॅरेज केले. महिनाभर सर्व काही ठीक होते. आम्ही मुंबईत एकत्र राहत होतो, पण जेव्हा मी आऊटडोअर शूटवरून परत आले तेव्हा आशिषची वागणूक पुन्हा बदलली. तो माझा छळ करायचा. माझे कपडे फाडायचा. पुढे एक दिवस भावाला भेटायला जात असल्याचे सांगून घरातून निघून गेला, मात्र त्यानंतर तो परत आलाच नाही. त्याचे कुटुंबही मला वेडी ठरवण्यासाठी खूप कष्ट करत होते. मी पैसा आणि प्रसिद्धीसाठी आशिषच्या मागे लागते असे त्यांचे म्हणणे होते. मी त्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की आशिषने त्यांना त्याचे काही फोटो दाखवले ज्यात दुखापतीच्या खुणा होत्या. आणि त्याच्या म्हणण्यानुसार मी हे सर्व केले होते. आम्ही घटस्फोट घ्यावा, अशी त्याच्या कुटुंबाची इच्छा आहे.

काजलच्या या आरोपांवर आशिषही गप्प बसला नाही आणि त्यानेही आपली बाजू मांडली. आशिषने सांगितले की, मी तिचा छळ केला नाही, तर तिने माझा छळ केला. मी कधी बाहेर ऑडिशनसाठी जायला निघालो की तेव्हा ती अशी परिस्थिती निर्माण करायची की मी जाऊ शकत नाही. ती माझा चेहरा ओरबाडायची, त्यानंतर मी ऑडिशनला जाऊ शकायचो नाही.

मी लग्नाला कधीच नकार दिला नाही. मी तिच्याशी लग्न केले आहे पण सध्या आम्ही एकत्र राहत नाही. ती मला पोलिस केसची धमकी द्यायची आणि गर्भपाताचा प्रश्न आहे, तिने स्वतः जाऊन हे काम एकटीने करून घेतले, हा तिचा स्वतःचा निर्णय होता, मी कधीही आग्रह केला नाही. तिचे सर्व आरोप निराधार असून ते खोटे आहेत. लग्नाच्या बहाण्याने तिने २०२२ मध्ये माझ्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता, २०२१ मध्येच आमचे लग्न झाले होते. आशिषने ते प्रमाणपत्रही दाखवले. आशिषने पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले आहे की, काजल आपल्यावर अत्याचार करत असे आणि ती घटस्फोटासाठी 75 लाख रुपयांची मागणी करत आहे. माझ्या करीअरमुळे मी लग्नाची गोष्ट सार्वजनिक केली नाही, पण त्यासाठी मी माझ्या घरच्यांना पटवून दिले जेणेकरून आपण लग्न करू, पण ती माझ्यासोबत असे का करत आहे, हे मला माहीत नाही.

काजलबद्दल बोलायचे तर ती देखील एक अभिनेत्री आहे आणि 2022 मध्ये स्टारच्या चिकू ये इश्क नचाये या शोमध्ये साराच्या भूमिकेत दिसली होती.