बडे अच्छे लगते है च्या शूटिंगदरम्यान अभिनेत्री ...

बडे अच्छे लगते है च्या शूटिंगदरम्यान अभिनेत्री नीति टेलर झाली जखमी (Tv Show Bade Achhe Lagte Hain 2 Actress Niti Taylor Gets Injured While Shooting For The Show, Deets Inside)

बडे अच्छे लगते हैं 2 या टीव्ही मालिकेने आता वीस वर्षांची लीप घेतली आहे. मालिकेत आता राम कपूर आणि प्रियाच्या प्रेमकथेच्या पलीकडे जाऊन त्यांच्या मुलींवर लक्ष केंद्रित केले जात आहे. निती टेलर आणि पूजा बॅनर्जी या दोघी राम आणि प्रिया यांच्या दोन मुलींच्या भूमिकेत दिसत आहेत.

पूजा राम आणि प्रियाची मोठी मुलगी पीहूच्या भूमिकेत आहे, तर नीती टेलर धाकटी मुलगी प्राचीच्या भूमिकेत आहे. मालिकेतील दोघांच्याही भूमिकेला प्रेक्षकांकडून खूप पसंती दिली जात आहे. दरम्यान, नीतीशी संबंधित एक बातमी समोर आली आहे., मालिकेच्या शूटिंगदरम्यान ती जखमी झाली आहे. नीतीने स्वत: इन्स्टाग्रामवर दुखापत झाल्याचा फोटो शेअर करून चाहत्यांना तब्येतीची माहिती दिली आहे.

नीतीने शेअर केलेल्या फोटोमध्ये तिच्या हातावर जखमेच्या आणि त्वचेची साल निघाल्याच्या खुणा दिसत आहेत. फोटो पाहून चाहते तिला काळजी घेण्याचा सल्ला देत आहेत.

नीतीबद्दल सांगायचे तर, तिने टीव्ही मालिका प्यारा का बंधनमधून मनोरंजन क्षेत्रात पदार्पण केले. तेव्हा ती अवघ्या पंधरा वर्षांची होती, पण तिला खरी ओळख आणि प्रसिद्धी कैसी ये यारियांमधून मिळाली. नीतीने झलक दिखला जा 10 मध्येही भाग घेतला होता.