मालमत्तेसाठी प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीची मुंबईत...

मालमत्तेसाठी प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीची मुंबईत निर्घृण हत्या, मुलानेच घेतला आईचा जीव (TV Actress Veena Kapoor Murdered by Son With Baseball Bat Over Property Dispute, Accused Arrested)

जुहूमध्ये एका ७४ वर्षीय महिलेची हत्या करण्यात आल्याची बातमी सर्वत्र वाऱ्यासारखी पसरली. मात्र, ही महिला दुसरी तिसरी कोणी नसून प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री वीणा कपूर आहेत. इतकेच नाही तर या हत्येप्रकरणात पोलिसांनी वीणा कपूर यांचा मुलगा आणि त्याचा साथीदार लालूकुमार मंडल यांना अटक केली आहे.

प्रसिद्ध अभिनेत्री वीणा कपूर (Veena Kapoor) यांची त्यांच्याच मुलाने निर्घृण हत्या (Murder) केली आहे. वीणा कपूर यांना त्यांच्या ४३ वर्षीय आरोपी मुलाने बेसबॉलच्या बॅटने मारहाण केली. यानंतर अभिनेत्रीचा मृत्यू झाला. वीणा कपूर यांच्या हत्येची बातमी ऐकताच सर्वांनाच मोठा धक्का बसलाय.

टीव्ही आणि चित्रपटांमध्ये वीणा यांनी अनेक भूमिका केल्या आहेत. एका महिलेचा मृतदेह हत्या करून फेकण्यात आल्याचा प्रकार जुहू पोलिसांनी उघड केला होता. याची बरीच चर्चाही झाली, अखेर या मृतदेहाची ओळख पटल्यानंतर त्या अभिनेत्री वीणा कपूर असल्याचे उघडकीस आले. ही हत्या त्यांच्या मुलानेच केल्याचा आरोप आहे. त्यामुळे त्याला आता पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

संपत्तीसाठी ही हत्या झाल्याचे प्रथमदर्शनी समजले आहे. हत्या केल्यानंतर मृतदेह नदीत फेकल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत खेद व्यक्त करणारी आणि वीणा यांच्या आठवणींना उजाळा देणारी एक पोस्ट अभिनेत्री नीलू कोहली यांनी शेयर केली आहे.

नीलू कोहली म्हणाल्या की, मी वीणा यांच्यासोबत मेरी भाभी या मालिकेमध्ये तब्बल ५ वर्ष काम केले आहे. इतकेच नाहीतर या मालिकेनंतरही आम्ही अजून एक मालिका सोबत केलीये.

पुढे नीलू कोहली म्हणाल्या, कोरोनाच्या काळाच्या अगोदरच आमचा संपर्क तुटला आणि त्यानंतर मी माझ्या काही प्रोजेक्टमध्ये बिझी झाले. मला अजूनही विश्वास बसत नाहीये की, त्या आज आपल्यासोबत नाहीयेत.

वीणा कपूर यांना दोन मुलं आहेत, त्यापैकी एक यूएसएमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे तर दुसऱ्या मुलाचे नाव सचिन आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सचिन कपूरनेच ही हत्या केली असून या प्रकरणी जुहू पोलिसांनी त्याला आणि त्यांच्या नोकराला अटक केली आहे. पोलिसांनी सचिन कपूर याच्याविरोधात कलम ३०२, २०१ आणि ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.