टीव्ही मालिका मधुबाला फेम अभिनेता विवियन डीसेना...

टीव्ही मालिका मधुबाला फेम अभिनेता विवियन डीसेनाने गपचूप केले दुसरे लग्न (TV Actor Vivian Dsena Gets Secretly Married To His Egyptian Girlfriend Nouran Aly… Here’s What We Know)

अभिनेता विवियन डीसेना याने लोकप्रिय टीव्ही मालिका मधुबालामधून भरपूर लोकप्रियता मिळवली. या मालिकेत त्याने आरके हे पात्र साकारले होते. त्याआधी त्याने तो प्यार की ये एक कहानी मध्येही काम केले होते, त्यानंतर विवियनने शक्ती अस्तित्व के एहसास की मध्येही रुबीना दिलैकच्या नवऱ्याची भूमिका साकारत होता. विवियनने सध्या अभिनयातून ब्रेक घेतला आहे, सर्वात शेवटी तो सिर्फ तुममध्ये दिसला होता. विवियनला जास्त चर्चेत राहिलेलेल आवडत नाही. तो खूप खाजगी आयुष्य जगतो. तरी त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे तो चर्चेत येतोच.

अशीच एक बातमी त्याच्याबद्दल व्हायरल होत आहे ती म्हणजे विवियनने दुसरं लग्न केलं असून त्याची दुसरी पत्नी माजी इजिप्शियन पत्रकार नौरान अली आहे. दोघे एकमेकांच्या प्रेमात पडल्यानंतर गेले एक वर्ष एकत्र राहत आहेत. दोघांनी एका खाजगी समारंभात गुपचूप लग्न केले. अभिनेत्याच्या बाजूने याबद्दल कोणतेही विधान आले नाही. विवियन आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलत नसल्यामुळे ही बातमी खरी की खोटे तेही नीट समजत नाही. मात्र अभिनेत्याने सूचित केले होते की तो लग्नाची तयारी करत आहे, परंतु ही त्याची वैयक्तिक बाब आहे आणि लग्न ही एक अतिशय खाजगी गोष्ट आहे, त्यामुळे तो याबद्दल कोणालाही सांगू शकणार नाही. एका मुलाखतीदरम्यान विवियनने सांगितले होते की, त्याला त्याच्या गर्लफ्रेंडसोबत सेटल व्हायचे आहे. अवघ्या महिनाभरात आपण प्रेमात पडल्याचे विवियनला समजले होते. आणि तो लग्नाच्या तयारीला लागला होता., पण तो खूप खासगी व्यक्ती असल्यामुळे मीडिया किंवा सोशल मीडियावरही लग्नाची बातमी देऊ शकणार नाही.

विवियनच्या मित्राच्या म्हणण्यानुसार, नौरन आणि अभिनेता एकत्र राहत होते. पण लग्न केल्याशिवाय एकत्र राहणे विवियन पटत नव्हते, म्हणून दोघांनी लग्न केले आणि आता ते मुंबईतील लोखंडवाला येथे एका फ्लॅटमध्ये राहतात. दोघांनी इजिप्तमध्ये नौरनच्या कुटुंबीयांच्या उपस्थितीत लग्न केलेहोते. आता त्यांच्या लग्नाला एक वर्षाहून अधिक काळ झाला आहे.

विवियनच्या प्रेमकथेबद्दल सांगायचे झाल्यास,  एका मुलाखतीदरम्यान त्याची नौरानशी भेट झाली. नौरान ही व्यवसायाने पत्रकार असून तिला बऱ्याच दिवसांपासून अभिनेत्याची मुलाखत घ्यायची होती. विवियन तिला टाळत राहिला आणि जवळपास तीन महिने वाट पाहायला लावल्यानंतर त्याने मुलाखत दिली. मुलाखत आणि या पहिल्या भेटीनंतरच दोघांची चांगली मैत्री झाली आणि या मैत्रीचे नंतर प्रेमात रुपांतर झाले.

विवियनचे पहिले लग्न 2013 मध्ये अभिनेत्री वहबिज दोराबजीसोबत झाले होते. दोघांची भेट प्यार की ये एक कहानीच्या सेटवर झाली होती. पण लग्नाच्या तीन वर्षानंतरच दोघेही वेगळे राहू लागले आणि 2021 मध्ये दोघेही कायदेशीररित्या वेगळे झाले, त्यांनी घटस्फोट घेतला. दोघांनीही कोणावरही आरोप न करता प्रसारमाध्यमांना सांगितले की, सर्व प्रयत्नांनंतरही आमचे नाते पुढे जाऊ शकत नाही आणि आम्ही परस्पर संमतीने वेगळे होत आहोत. आम्ही एकत्र काम करत राहू आणि आता चूक कोणाची आणि कोणाची नाही यावर चर्चा व्हायला नको.