अक्षय्य तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर राणादा-पाठकबा...

अक्षय्य तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर राणादा-पाठकबाईंचा साखरपुडा संपन्न (Tuzhat-Jeev-Rangala-Fame-Akshaya-Deodhar-And-Hardik-Joshi-Engaged )

‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेतून प्रेक्षकांच्या घरा-घरात पोहोचलेल्या राणादा आणि पाठकबाई म्हणजेच अभिनेता हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर यांचा नुकताच साखरपुडा संपन्न झाला. छोट्या पडद्यावर लोकप्रिय ठरलेल्या या जोडीनं त्यांच्या खऱ्या आयुष्याची नवी सुरुवात करत चाहत्यांना सुखद धक्का दिलेला आहे. अक्षया आणि हार्दिक यांच्या साखरपुड्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.

अक्षया आणि हार्दिक सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. दोघांनी त्यांच्या साखरपुड्याचे फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. फोटोंमध्ये त्यांचा स्टायलिश अंदाजही पाहायला मिळतोय. फोटोंमधील दोघांची केमेस्ट्रीही चाहत्यांना आवडतेय. हार्दिकने फोटोला ‘अखेर साखरपुडा पार पडला…# अहा…’ अशी कॅप्शन दिली आहे. यातही अ म्हणजे अक्षरा आणि हार्दिकचा हा असं एकत्र केलं आहे. त्यांच्या या मडिया पोस्टवर चाहत्यांसह अनेक सेलिब्रेटींनी दोघांना पुढील वाटचालीसाठी शुभच्छा दिल्या आहेत.  

‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेतील राणादा आणि पाठक बाईंच्या जोडीला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं. हार्दिक आणि अक्षया यांची जोडी प्रेक्षकांची अत्यंत आवडती जोडी होती. मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला असला तरी या जोडीची जादू प्रेक्षकांच्या मनावर कायम आहे. या दोघांच्या खास नात्याची अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होती.

२ वर्षांपूर्वी हार्दिकनं अक्षयासोबतचा एक फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट करत त्यांच्यातील नात्याची अप्रत्यक्षरित्या कबुली दिली असल्याची ती पोस्टही आता व्हायरल होत आहे. त्यात राणादाने त्यांच्या फोटोला, ‘पडद्यावरची सोज्वळ chemistry नि् पडद्यामागची निखळ मैत्री…याच्याही जरा पल्याडच आहे आमचं “Strong Bonding!..” अशी कॅप्शन दिली होती. परंतु आता या दोघांनी चाहत्यांना सुखद धक्का देत नवीन नात्याबद्दल सांगतिलं आहे.