‘खतरों के खिलाडी -१२’ चा विजेता ठरला तुषार कालि...

‘खतरों के खिलाडी -१२’ चा विजेता ठरला तुषार कालिया, मिळाले २० लाख रुपए आणि ट्रॉफी, फैसल शेख ठरला फर्स्ट रनर-अप (Tushar Kalia wins show, Takes Home Trophy, ₹20 Lakh And Car, Faisal Shaikh Is First Runner-Up)

रोहित शेट्टीने होस्ट केलेल्या ‘खतरों के खिलाडी-12’ या रिअॅलिटी शोची अंतिम फेरी पार पडली असून नृत्यदिग्दर्शक तुषार कालिया हा या पर्वाचा विजेता ठरला आहे. बक्षीस म्हणून त्याला विजेत्याची ट्रॉफी आणि २० लाख रुपये मिळाले आहेत. या शोचा फर्स्ट रनर अप फैजल शेख उर्फ ​​मिस्टर फैजू होता.

‘खतरों के खिलाडी’ या कार्यक्रमाचे १२ वे पर्व २ जुलै रोजी सुरू झाले होते आणि काल २५ सप्टेंबर रोजी याचा ग्रँड फिनाले पार पडला.

स्टंटवर आधारित या रिअॅलिटी शोचे टॉप फायनलिस्ट रुबिना दिलैक, जन्नत जुबेर, मोहित मलिक आणि फैसल शेख यांना पराभूत करून नृत्यदिग्दर्शक तुषार कालिया याने या विजेतेपदावर आपले नाव कोरले. बक्षीस म्हणून, तुषारला 20 लाख रुपयांची रक्कम आणि एक चमकणारी नवीन मारुती सुझुकी स्विफ्ट कार मिळाली आहे. फैसल शेख उर्फ मिस्टर फैजू हा शोचा फर्स्ट रनर अप ठरला आहे.

खतरों के खिलाडी-12 च्या ग्रँड फिनालेमध्ये रणवीर सिंग, पूजा हेगडे, जॅकलिन फर्नांडिस, वरुण शर्मा, सिद्धार्थ जाधव आणि जॉनी लीव्हर पाहुणे म्हणून आले होते.

रुबिना दिलैक आणि जन्नत जुबेर या शोच्या शेवटच्या दोन स्पर्धक होत्या. ज्या बाद झाल्या. सर्वच स्पर्धकांनी धाडसाने स्टंट करून दर्शकांचे मनोरंजन केले.