तुनिषाच्या आईने दाबला होता तिचा गळा, तुनिषाला स...

तुनिषाच्या आईने दाबला होता तिचा गळा, तुनिषाला स्वतःच्याच पैशांसाठी आईपुढे हात पसरावे लागायचे; शीझानच्या कुटुंबाचे मोठे वक्तव्य, शीझान खानच्या कुटुंबाने फटकारले तुनिषाच्या आईला (Tunisha’s mother tried to strangulate her, She used to control her life and finances, Sheejan Khan’s family breaks slams Actress mother)

टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्माच्या मृत्यू प्रकरणाच आता खळबळजनक वळण आले आहे. आज शीझान खानच्या कुटुंबीयांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत शीझानच्या आई आणि बहिणींनी तुनिषा शर्माची आई वनिता शर्मा यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. एवढेच नाही तर शीझानच्या वकिलाने देखील अनेक खळबळजनक खुलासे केले आहेत.

आज पत्रकार परिषदेत  शीझानच्या बहिणीने सांगितले की, शीझान आणि तुनिशा यांचे ब्रेकअप झाले नाही. तुनिषाची आई सर्व गोष्टींचा विपर्यास करत आहे. त्याची बहीण म्हणाली, खरं सांगायचं तर तुनिषाला काम करायचं नव्हतं. तिला शूटला जायचं नसायचं. तिला हिंडायचं होतं. पण तिची आई तिला जबरदस्ती काम करायला लावायची. तुनिषाची आई तिला वारंवार फोन करत असे. कधी कधी तर रागाच्या भरात तुनिषा तिचा फोन फेकून द्यायची. तुनिषाला कधीच आईचे प्रेम मिळाले नाही. ती आईवर नाराज होती आणि आमच्यासोबत ती खुश होती. आम्हाला खूप अभिमान आहे की आम्ही तिला ५ महिने खूप आनंद दिला. शीझानच्या बहिणीने सांगितले की, तुनिषा १५ दिवसांपासून खूप अस्वस्थ होती. त्या परिस्थितीत तिच्या आईने तिच्यासोबत सेटवर  जायला हवे होते  ना?

तुनिषाला हिजाब घालण्यास भाग पाडल्याच्या मुद्द्यावर ती म्हणाली, “तुनिषाचा हिजाबचा फोटो सेट झाला आहे. सेटवर गणपतीचे सेलिब्रेशन सुरू होते आणि तुनिषाने सीन दरम्यान हिजाब घातला होता. त्याच दृश्याचा हा फोटो आहे. आणि भाषा शिकण्याचे म्हणाल तर, भाषा बोलणे म्हणजे धर्म बदलणे नव्हे. जेव्हा तुम्ही एखादा मिथ्या शो करता तेव्हा तुम्हाला ती भाषा शिकावी लागते. आपण धर्मावर कुठे अडकलो आहोत. हा मानसिकतेचा प्रश्न आहे.

शीझानच्या आईने त्यांच्या ब्रेकअपबद्दल सांगितले. त्याबद्दल बोलताना शीझानची बहिण म्हणाली, “दोघांमध्ये ब्रेकअप झालेला नाही की, ज्यामुळे तुनिषाने स्वतःचा जीव घेतला. असे झाले असते तर तुनिषाने शूटिंग केलीच नसती. ब्रेकअपच्या १५ दिवसानंतर कोण आत्महत्या करतं? जे मनात येईल ते बोलतात. तुनिषाचे हे पहिलं प्रकरण नव्हतं. याआधीही तुनिषाची दोन प्रेमप्रकरणं होती, जी तुटली. पण त्यामुळे ती कधीच खचली नाही.’’ तुनिषा, शीझान आणि त्याच्या कुटुंबाला गेल्या ५ महिन्यांपासून ओळखत होती. शीझान आणि तुनिषाला करिअरवर लक्ष केंद्रित करायचे होते. तुनिषाच्या आईला तिचं शीझानसोबतचं नातं नको होतं.” शीझानची एक गर्लफ्रेंड असल्याचंही तिने नाकारलं.

शीझानच्या वकिलानेही तुनिषाच्या आईबाबत अनेक खळबळजनक दावे केले आणि तुनिषाचे तिच्या आईसोबत चांगले संबंध नसल्याचे सांगितले. तिच्या आईने तुनिषाचा गळा दाबला होता, असे तुनिषाने ती ज्या मालिकेत काम करत होती, त्या मालिकेच्या दिग्दर्शकाला सांगितले होते असे ते म्हणाले. शीझानच्या वकिलाने तिच्या आईचा मित्र संजीव कौशल याचाही उल्लेख केला. वकिलाचे म्हणणे आहे की, संजीव कौशल  आणि वनिता हे दोघं तुनिषाच्या पैशावर पूर्णपणे नियंत्रण ठेवायचे. तुनिषाला काही खावेसे वाटले तर तिच्या खात्यात पैसे नसायचे. मला १०० रुपये पाठवा, ५०० रुपये पाठवा, २०० रुपये पाठवा, अशी विनंती ती तिच्या आईला करायची. त्यानंतरही आई अनेक प्रश्न विचारून तिला पैसे पाठवत असे. तुनिषा स्वतः कमावती असूनही पैशासाठी आईवर अवलंबून होती. वकिलाने असेही सांगितले की, तुनिषा संजीव कौशलला घाबरत होती.