तुनिषाच्या आईने केले शीझानच्या कुटुंबियांवर गंभ...

तुनिषाच्या आईने केले शीझानच्या कुटुंबियांवर गंभीर आरोप (Tunisha’s Mother Makes Serious Allegations Against Sheezan’s Family)

अभिनेत्री तुनिषा शर्माने 24 डिसेंबरला मालिकेच्या सेटवरील मेकअप रुममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. तिच्या आत्महत्येमुळे संपूर्ण मनोरंजन सृष्टीत खळबळ उडाली आहे. तुनिषा केवळ 20 वर्षांची होती. तिच्या आत्महत्येनंतर तिचा सहकलाकार शीझान खानला अटक करण्यात आली आहे.

तुनिषाच्या आईने आज पत्रकार परिषद घेऊन अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. या परिषदेत त्यांनी शीझान आणि त्याच्या कुटुंबियांवर गंभीर आरोप लावले आहेत. तुनिषाच्या आईने म्हटलं की, शीझान नशा करायचा, तुनिषाने स्वत: मला याबद्दल सांगितलं होतं. शीझानने फक्त तुनिषाचा वापर केला आणि तिला फसवलं. जेव्हा मी याबद्दल त्याला जाब विचारण्यासाठी गेले तेव्हा मी त्याचं काहीच करु शकत नाही, जे करायचं ते करा असं शीझान म्हणाला.

जर त्याचे दुसऱ्या मूलीसोबत संबंध होते तर तो तुनिषासोबत का रिलेशनमध्ये आला, वयातील अंतर आणि धर्मामुळे दोघांचे ब्रेकअप झाले असं शीझान म्हणतोय, मग सुरुवातीलाच प्रेम करताना वयातलं अंतर- धर्म त्याला का कळला नाही? असे सवालही तुनिषाच्या आईनं निर्माण केले आहेत. शिझानची आई तुनिषाला त्रास देत असल्याचं देखील तुनिषाच्या आईनं पत्रकार परिषदेत म्हटलं. पूर्ण कुटुंबानं तिचा फक्त वापर केला.

तिच्याकडून महागडे गिफ्ट घेतले,शीझानच्या बोलण्यामुळे ती खचली होती. शीझानची आई तिला वारंवार फोन करुन तिला मानसिक त्रास देखील द्यायची असे गंभीर आरोप तुनिषाच्या आईनं शीझानच्या कुटुंबावर देखील केले आहेत.

आत्महत्येपूर्वी तिने मला फोन केला होता. तिला ख्रिसमस साजरा करण्यासाठी चंदीगढला जायचे होते. दोन दिवसांनी ती चंदीगढला जाणार असल्यामुळे खूप खुश होती. मात्र अर्धा तासात असं काय घडलं की तिने आत्महत्येसारखं टोकाचं पाउल उचललं,असा सवालही तुनिषाच्या आईनं पत्रकार परिषदेत विचारला.