पोटच्या पोरीचा मृतदेह पाहिल्यावर तुनिषाच्या आईच...

पोटच्या पोरीचा मृतदेह पाहिल्यावर तुनिषाच्या आईची शुद्ध हरपली(Tunisha- Sharma Death: Actress mother is completely devastated after losing her daughter, faints after seeing daughter’s dead body)

‘अली बाबा: दास्तान ए काबुल’ मधील मुख्य अभिनेत्री तुनिषा शर्मावर आज अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत. अंतिम विधींना 3 वाजल्यापासून सुरूवात झाली आहे. शनिवारी या शोच्या सेटवर तुनिषाने मेकअप रूममध्ये गळफास लावून घेतला. 20 वर्षीय अभिनेत्रीच्या मृत्यूने तिचे कुटुंब, मित्र आणि चाहते शोक सागरात बुडाले आहेत. तुनिशा आता या जगात नाही यावर अजूनही कोणाचा विश्वास बसत नाहीये.

तिच्या निधनाने सर्वांनाच धक्का बसला आहे. तुनिषाच्या आईला आपल्या मुलीच्या मृत्यूच्या बातमीने जबर धक्का बसला आहे. आपली एकुलती एक मुलगी गमावल्याचे दुःख त्यांना सहन होत नाहीय. त्यांचा एक भावनिक व्हिडिओ समोर आला आहे, तो पाहून प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी येत आहे.

तुनिषा शर्माच्या मृत्यूने तिची आई हादरली आहे. काल रात्री तुनिषाची आई कुटुंबातील काही सदस्यांसह आपल्या मुलीचा मृतदेह पाहण्यासाठी रुग्णालयात गेली होती. हॉस्पिटलमध्ये जाताना आणि बाहेर येताना अभिनेत्रीच्या आईचा एक व्हिडिओ समोर आला आहे, त्यामध्ये त्यांची प्रकृती खूपच बिघडलेली दिसत आहे. त्यांची शुद्ध हरपलेली दिसत आहे. त्यांना आधार देण्यासाठी त्यांचे कुटुंबीय त्यांना धरून बसलेले दिसत आहेत. तुनिषाच्या आईचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आपल्या एकुलत्या एक मुलीचा मृतदेह पाहून तिची आई पूर्णपणे तुटून गेली आहे. आणि मुलीचा मृतदेह पाहून त्या बेशुद्ध झाल्याचं सांगण्यात येत आहे.

 एकुलती एक मुलगी गमावल्यानंतर आईची अशी अवस्था पाहून लोकांचेही डोळे पाणावले आहेत. त्यांच्यासाठी तसेच त्या या धक्क्यातून लवकर सावरण्यासाठी सर्वजण प्रार्थना करत आहेत.

टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्मा फक्त 20 वर्षांची होती. तुनिषाने शनिवारी तिच्या शो ‘अली बाबा: दास्तान-ए-काबुल’च्या सेटवर मेकअप रूममध्ये गळफास लावून आत्महत्या केली. यानंतर तुनिषाच्या आईने आपल्या मुलीचा एक्स बॉयफ्रेंड शीजान खानवर तिला आत्महत्या करण्यासा प्रवृत्त केल्याचा आरोप केला होता.

आपल्या मुलीला लग्न करण्याचे आश्वासन देऊन शीजान इतर मुलींशी संबंध ठेवत होता. त्याने तुनिषाची फसवणूक करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचेही त्यांनी काल मुलाखतीत सांगितले. यासोबतच शीजानला शिक्षा देण्याची मागणीही त्यांनी केली.