‘आई असती तर म्हणाली असती – किती बारीक झाल...

‘आई असती तर म्हणाली असती – किती बारीक झाला आहेस, गाल आत गेले आहेत…’ आईच्या आठवणीने भावूक झाला शाहरुख खान (‘Tum bohot patle ho gaye ho, Gaal andar chale gaye hain…’ Shahrukh Khan gets emotional While talking about his Parents)

शाहरुख खान करोडो हृदयांवर राज्य करणाऱ्या किंग खानला रोमान्सचा राजा म्हटले जाते. एक अप्रतिम अभिनेता असण्यासोबतच शाहरुख एक कौटुंबिक आणि उत्तम माणूस आहे. त्याचे त्याच्या संपूर्ण कुटुंबासोबतचे बाँडिंग खूप चांगले आहे आणि त्याला जवळजवळ प्रत्येक सण-उत्सव त्याच्या कुटुंबासोबत साजरे करायला आवडतात.

लहानपणीच शाहरुख खानने त्याचे आई-वडील गमावले होते. त्याचे आईवर खूप प्रेम होते. त्याने एकदा सांगितले की, त्याने आयुष्यात कधीही देवाकडे प्रार्थना केली नव्हती, परंतु जेव्हा त्याची आई आयसीयूमध्ये होती आणि तिला श्वासोच्छवासाचा ॲटॅक आला, तेव्हा पहिल्यांदा त्याने देवाकडे प्रार्थना केली. आपली आई आपले यश पाहू शकली नाही याची खंत किंग खानला नेहमीच वाटत असते. पुन्हा एकदा तो आपल्या आईच्या आठवणीने भावूक झाला. अन्‌ त्याचे शब्द ऐकून चाहतेही भावूक होत आहेत आणि त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव करत आहेत.

किंग खान आदल्या दिवशी शारजाह आंतरराष्ट्रीय पुस्तक मेळ्यात उपस्थित होता. तेथे त्याला ग्लोबल आयकॉन ऑफ सिनेमा अँड कल्चरल नॅरेटिव्ह अवॉर्डने सन्मानित करण्यात आले. येथे त्याने माध्यमांच्या प्रश्नांनाही उत्तरे दिली. तेव्हा त्याला आज त्याचे आई-वडील हयात असते तर त्याने मिळवलेले यश पाहून पालक काय म्हणाले असते? असा प्रश्न विचारण्यात आला.

या प्रश्नाचे उत्तर देताना मात्र शाहरुख खान भावूक झाला आणि म्हणाला, “मला वाटतं, मला पाहून आईने पहिली गोष्ट सांगितली असती की, तू खूप बारीक झाला आहेस. थोडे वजन वाढव. तुझा चेहरा किती वाळला आहे, तुझे गालही आत गेले आहेत.

शाहरुख खान पुढे म्हणाला, “माझे आई-वडील हयात असते तर त्यांना माझं यश पाहून खूप आनंद झाला असता… जर मी याला खरोखर यश म्हणू शकलो, तर मला वाटते की आपण सर्वांनी प्रयत्न करून जगले पाहिजे… आम्ही आमच्या तिन्ही मुलांना ज्या प्रकारे वाढवलं, ते पाहून माझ्या आईवडिलांना खूप आनंद झाला असता.

शाहरुखच्या कामाबाबत बोलायचं तर जवळपास 3 वर्षांनंतर तो बॉक्स ऑफिसवर परतणार आहे. लवकरच तो ‘जवान’ आणि ‘पठाण’ या चित्रपटांमध्ये दिसणार आहे, हे दोन्ही अॅक्शन चित्रपट आहेत, ज्यामध्ये शाहरुखची वेगळी शैली पाहायला मिळणार आहे.