रणवीर सिंहच्या न्यूड फोटोशूटने प्रेरित होऊन अभि...

रणवीर सिंहच्या न्यूड फोटोशूटने प्रेरित होऊन अभिनेता कुणाल वर्मानेही केले न्यूड फोटोशूट (‘Tujh Sang Preet Lagai Sajna’ actor Kunal Verma takes ‘inspiration’ from Ranveer Singh, poses nude for photos)

अभिनेता रणवीर सिंहने न्यूड फोटोशूट केल्यापासून मनोरंजन क्षेत्रात खळबळ उडाली आहे. या फोटोशूटवरुन सुरु असलेला गोंधळ अद्याप थांबलेला नाही. रणवीर सिंहला प्रेरित होऊन आता आणखी एका अभिनेत्याने न्यूड फोटोशूट केले आहे. ‘तुझ संग प्रीत लगाई सजना’ या मालिकेतील अभिनेता कुणाल वर्माने नुकतेच रणवीर सिंहसारखे न्यूड फोटोशूट केले. या फोटोशूटमध्ये कुणालने हुबेहूब रणवीरसारख्याच पोज दिल्या आहेत. कुणालने त्यातील एक फोटो त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर करत त्याला कॅप्शन दिले की, “माझ्याकडे मर्यादित पैसे होते त्यामुळे मला ते माझ्या शरीरावर खर्च करणे योग्य वाटले.”

या फोटोशूटबद्दल कुणालने सांगितले की, मी माझे शरीर कमावण्यासाठी खूप कष्ट घेतले आहेत. मग मी ते लपवून का ठेवू. कुणालने हे फोटोशूट रणवीरपासून प्रेरित होऊन केल्याचे सांगितले. हे सर्व फोटो कुणालची पत्नी पूजा बॅनर्जीने काढले आहेत.   

रणवीरच्या न्यूड फोटोशूटला पाठिंबा देताना कुणालने म्हटले, या गोष्टींसाठी कोणीतरी पुढाकार घेतलाच पाहिजे आणि रणवीरने ते काम खरोखरचं सुंदर केले आहे. पण काही लोकांना त्यात नग्नता दिसते. पण करणार काय, प्रत्येकाला समजवता येत नाही. मी रणवीरपासून प्रेरित होऊन हा फोटो काढला आहे.

मला त्यात कोणतीही नग्नता दिसली नाही.मी हा फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे आणि जर तुम्ही काळजीपूर्वक पाहिले तर मी मिनी किंवा मायक्रो शॉर्ट्स घातल्याचे तुमच्या लक्षात येईल.

कुणालच्या आधी बिग बॉस फेम असीम रियाझनेही त्याचे न्यूड फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. असीमने 2017 मध्ये हे शूट केले होते पण त्याने ते कधी पोस्ट केले नाही. पण यावेळी मात्र ते पोस्ट करण्याचे धाडस त्याला रणवीरकडून मिळाल्याचे त्याने सांगितले.

त्याआधी ‘बडे अच्छे लगते हैं 2’मधील अभिनेता नकुल मेहतानेही रणवीरला पाठिंबा देण्यासाठी त्याने रणवीरच्या न्यूड फोटोतील त्याचा चेहरा एडिट करून त्यावर आपला चेहरा लावला होता. नकुलचा हा अनोखा अंदाज त्याच्या चाहत्यांना खूप आवडला.