मेकअप करताना हे ब्युटी ब्लेंडर वापरून पाहा (Try...

मेकअप करताना हे ब्युटी ब्लेंडर वापरून पाहा (Try These Beauty Blenders While Applying Makeup)


मेकअप ब्रशेसपेक्षा ब्युटी ब्लेंडर हे मेकअप करण्यासाठी अधिक आरामदायक आणि सोपे आहे. त्यामुळे अनेक सौंदर्यतज्ज्ञ देखील ब्युटी ब्लेंडर वापरतात. ब्युटी ब्लेंडर स्पंज वापरल्याने, मेकअप अधिक चांगल्या प्रकारे त्वचेवर सेट होतो.
आपण बाजारात येणार्‍या उत्पादनांवर जर नजर टाकली तर तेथे सतत नावीन्यपूर्ण व अधिक सोयीस्कर अशा गोष्टी आपल्याला आढळून येतात. बरेचदा आपल्याला त्यापैकी काही वस्तू वापरायच्या कशा हे कळत नसते. त्यामुळे आपण अनेक उत्पादनांमधून योग्य निवड करण्यात अयशस्वी होतो. आता हेच पाहा. आत्तापर्यंत आपण मेकअपसाठी ब्रशेस वापरत आलो आहोत, पण आता ब्युटी ब्लोअर किंवा स्पंज हे सर्वोत्तम मेकअप उत्पादनांपैकी एक आहे. हे अतिशय हलके आणि वापरण्यास सोपे आहे.

ब्युटी ब्लेंडर स्पंज वापरण्याची योग्य पद्धत
आजकाल फ्लॉलेस मेकअपसाठी ब्युटी ब्लेंडर स्पंजचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातोय. मेकअप ब्रशेसपेक्षा ब्युटी ब्लेंडर हे मेकअप करण्यासाठी अधिक आरामदायक आणि सोपे आहे. त्यामुळे अनेक सौंदर्यतज्ज्ञ देखील ब्युटी ब्लेंडर वापरतात. ब्युटी ब्लेंडर स्पंज चेहर्‍यावर फाउंडेशन सेट करण्यासाठी उत्तम मानले जाते.
ब्युटी ब्लेंडर स्पंज वापरल्याने, मेकअप अधिक चांगल्या प्रकारे त्वचेवर सेट होतो, परंतु मेकअपच्या उत्तम रिझल्टसाठी, आपण ते योग्यरीत्या वापरणे देखील आवश्यक आहे. चला तर मग जाणून घेऊया ब्युटी ब्लेंडर स्पंज वापरण्याची योग्य पद्धत कोणती आणि त्याचे फायदे काय असू शकतात.

फ्लॉलेस मेकअपसाठी ब्युटी स्पंजचा वापर
मेकअप करताना स्किन आणि स्पंजवर कधीही फाउंडेशन लावू नका. पहिल्यांदा हातावर फाउंडेशन आणि कन्सीलर लावा. यानंतर स्पंजच्या मदतीने चेहर्‍यावर फाउंडेशन आणि कन्सीलर लावा. यामुळे फाउंडेशन आणि कन्सीलर चांगले मिसळतील आणि स्किन प्लेन होईल.
मेकअप सेट करण्यासाठी जर तुम्ही अंड्याच्या आकाराचा ब्युटी स्पंज वापरत असाल तर त्यामुळे उत्तम मेकअप करता येईल. अंड्याच्या आकाराचे ब्लेंडर वापरल्याने मेकअप चांगला सेट होतो. स्पंजच्या टोकाचा वापर करून डोळ्यांखाली, ओठांच्या जवळ आणि नाकाच्या बाजूला मेकअप ब्लेंड करा. स्पंजच्या गोलाकार भागाने कपाळ आणि गालांवर मेकअप ब्लेंड करा.

मेकअप घासून काढू नका
मेकअप करताना हे लक्षात ठेवा की मेकअप कधीही घासू नये. मेकअपला नेहमी स्पंजने लावून घ्या. अशा पद्धतीने मेकअप लावल्याने सॉफ्ट पद्धतीने बेस तयार होतो. तसेच, मेकअप त्वचेत चांगला एकजीव केला जातो, ज्यामुळे घाम आल्यावरही मेकअप खराब होत नाही. स्पंजने मेकअप लावल्याने मेकअप बराच काळ चेहर्‍यावर टिकून राहतो.