विजेचं बिल असं कमी करा (Tri...

विजेचं बिल असं कमी करा (Tricks to cut-down Electricity Bills)

विजेचं बिल जास्त येतंय, अशा तक्रारी सध्या सर्रास ऐकू येतात. लॉकडाऊनमुळे एकाच वेळी
घरात माणसं जास्त असल्याने पंखे, टी.व्ही., मोबाईल चार्जिंग, लॅपटॉप चार्जिंग, लाइट्स यांचा
वापर जास्त होत असल्याने वीज जास्त वापरली जाते आणि बिल वाढतं. तरीपण खालील
उपायांनी पैसे वाचवा.

  • 1) टी.व्ही., मिक्सर, ए.सी. इत्यादी वस्तू वापरात नसतील तेव्हा त्यांचा स्विच बंद करा व प्लगही काढून ठेवा.
  • 2) रात्री घरातील सर्व लाइट्स चालू ठेवू नका. ज्या खोलीत वावर नसेल, त्यातील लाइट्स बंद
    करण्याची सवय लावून घ्या.
  • 3) गीझरचं गरम पाणी एकदाच काढून घ्या. ते किमान दोघांनी वापरा.
  • 4) फ्रिजची वारंवार उघडझाप करू नका. वारंवार उघडल्याने त्याचं तापमान बिघडतं आणि जास्त वीज खर्च होते.