जिजाऊंच्या जयंतीला वृक्षारोपण (Tree Plantation ...
जिजाऊंच्या जयंतीला वृक्षारोपण (Tree Plantation On the Birth Anniversary of Jijabai)

By Atul Raut in मनोरंजन , मालिका दर्शन
काल महाराष्ट्रात राजमाता जिजाबाई यांची जयंती साजरी करण्यात आली. त्यांच्या जीवनावर ‘स्वराज्यजननी जिजाबाई’ ही मालिका सोनी मराठी वाहिनीवर सुरू आहे. तेव्हा जिजाऊ मांसाहेबांची जयंती या मालिकेच्या सेटवर वेगळेपणाने साजरी करण्यात आली. मालिकेच्या टीमने तिकडे मोकळ्या जागेत १५० रोपटी लावली. या प्रसंगी डॉ. अमोल कोल्हे म्हणाले की,” मी सगळ्यांना आव्हान करतो की, झाडांनाही एखाद्या सेलिब्रेटीप्रमाणे मान द्या. तरच लोकं त्यांना जपतील.”

या प्रसंगी जिजाबाईंची भूमिका करणाऱ्या नीना कुळकर्णी आणि वृक्षप्रेमी सयाजी शिंदे उपस्थित होते.